नॅशनल इंग्लिश स्कूल येथे विज्ञान प्रदर्शन; विद्यार्थ्यांच्या प्रयोगशीलतेचे कौतूक

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी)  : हमदर्द चॅरिटेबल ट्रस्टद्वारे संचालित नॅशनल इंग्लिश स्कूल, अजंता येथे बुधवारी भव्य विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन गट शिक्षण अधिकारी रमेश ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे, गट समन्वयक रामचंद्र मोरे, आयएसओ समन्वयक प्रा. प्रशांत जोशी, बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. डी, कवाल, वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके उपस्थित होते. तसेच संस्थेचे अध्यक्ष इकबाल अहमद, संचालक शमसुलहक, शेख जियाउल हक, अमीर हमजा, शेख मोइनुलहक, माजी सरपंच सय्यद नासेर हुसैन, संजय जाधव, अरुण चव्हाण, शेख सलीम, मारोती गव्हाणे, डॉक्टर आसिम अहमद, डॉक्टर काशिफ यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

प्रस्तावना संस्थाध्यक्ष इकबाल अहमद वैज्ञानिक विचारसरणी, प्रयोगशीलता व नवोन्मेषाची सवय लागते, असे त्यांनी आपल्या मनोगतात नमूद केले. प्रमुख अतिथींचे मार्गदर्शन गट शिक्षण अधिकारी रमेश ठाकूर यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रत्येक मॉडेलची सखोल माहिती घेत त्यांचे कौतुक केले. विज्ञान है केवळ पाठ्यपुत्त्तकापुरते मर्यादित न राहता दैनंदिन जीवनाशी जोडले गेले पाहिजे, असे सांगून विद्याथ्यांनी प्रश्न विचारण्याची सवय लावावी व नवनवीन प्रयोग करावेत, असा सल्ला त्यांनी दिला. 

शिक्षण विस्तार अधिकारी राजीव फुसे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांमध्ये
दिसणारी कल्पकता आणि सादरीकरणाची शैली प्रशंसनीय असल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच स्पर्धात्मक परीक्षांसाठी तयारी करण्याची मानसिकता तयार होते, असे व्यांनी नमूद केले. आयएसओ समन्वयक प्रा. प्रशांत जोशी यांनी वैज्ञानिक प्रकल्पांमध्ये अचूकता, निरीक्षण आणि विश्लेषणाचे महत्त्व स्पष्ट केले. 

आजचा विद्यार्थी उद्याचा संशोधक आहे, असे सांगून त्यांनी विज्ञान क्षेत्रात करिअर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बाल विकास प्रकल्प अधिकारी व्ही. डी. कावल यांनी पर्यावरणपूरक प्रकल्पांचे विशेष कौतुक केले. ऊर्जा संवर्धन, पाणी व्यवस्थापन आणि प्रदूषण नियंत्रण यासारखे विषय आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचे असून विद्यार्थ्यांनी समाजोपयोगी प्रकल्प तयार केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले, 

वन परिक्षेत्र अधिकारी संतोष दोडके यांनी नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन, वृक्षलागवड आणि पर्यावरण रक्षणाविषयी मार्गदर्शन केले. विज्ञानाच्या माध्यमातून निसर्गाशी सुसंगत जीवनशैली स्वीकारण्याचा संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला. प्रदर्शनातील प्रकल्प या विज्ञान प्रदर्शनात इयत्ता चौथी से दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मॅथ सिटी, नैसर्गिक शेती, ऊर्जा संवर्धन, वायू प्रदूषण, कचरा व्यवस्थापन, पायथागोरस सिद्धांत, पावसाचे पाणी साठवण, हालचालींचे प्रकार, ३ होलोग्राम, ऑटोमेंटिक बॉटर डिस्पेंसर, सांडपाणी प्रक्रिया, हवेला वजन असते, कोनांवरील प्रकल्प, धरण ओव्हरफ्लो अलार्म अशा विविध विषयांवर प्रभावी मॉडेल सादर केली. 

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी नॅशनल इंग्लिश स्कूल तसेच खैरुन्निसा उर्दू प्राथमिक शाळा येथील मुख्याध्यापक शेख अफसर, जहीर अंसारी, गुलाम खुसरो व सर्व शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. विज्ञान प्रदर्शनामुळे विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक जिज्ञासा वाढीस लागून शाळेचे शैक्षणिक बातावरण अधिक समृद्ध झाल्याचे दिसून आले.