२१ तारखेला कंकणाकृती सूर्यग्रहण
२६ डिसेंबर २०१९ नंतर या महिन्यात २१ तारखेला रविवारी कंकणाकृती सूर्यग्रहण असणार आहे. भारतात राज्यस्थान, हरियाणा, उत्तरांचल परिसरात कंकणाकृती सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे. तर उर्वरित भारतात खंडग्रास सूर्यग्रहण पहायला मिळणार आहे. औरंगाबाद मध्ये सकाळी १० वाजून ६ मिनिटाने ग्रहण सुरू होईल. तर ग्रहण मध्य ११ : ४६ ला तर ग्रहण समाप्ती १ वाजून ३६ मिनिटाला असणार आहे अशी माहिती एमजीएम एपीजे अब्दुल कलाम खगोलअंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी दिली.
राजस्थान सुरतगड काही सेकंद तर हरियाणा येथील जखल, कुरुक्षेत्र गावात कंकणाकृती सूर्यग्रहण ३१ सेकंद, उत्तरांचल, डेहराडून, जोशी मठ भागात २७ ते २८ सेकंद दिसणार आहे. याशिवाय महाराष्ट्रात खंडग्रास स्थितीत साधारणतः १० वाजता सुरूवात होणार आहे. तसेच महाराष्ट्रात प्रत्येक गावाच्या महाराष्ट्रात मध्यग्रहण होईल. तर ग्रहण समाप्ती ही १: २७ ते १: ५० दरम्यान पाहायला मिळेल. साधारणतः साडे तीन तास ग्रहण महाराष्ट्रात बघायला मिळेल. तर ११:४६ ला ६१ % सूर्य ग्रासलेला पहायला मिळेल. प्रत्येक गावात वेगवेगळ्या वेळेत ग्रहण पहायला मिळणार आहे.
अशी काळजी घ्यावी
ग्रहण काळात सूर्याकडे पाहूच नये. विशेष गॉगल चा वापर करावा. स्क्रीन हॉल कॅमेराद्वारे बघावे. ग्रहण बघण्यासाठी विशेष ग्रहणचष्मा असतो त्याचा वापर करावा. तसेच यावर्षी कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे नागरिकांनी घराच्या बाहेर रस्त्यावर येऊन ग्रहण पाहण्यासाठी गर्दी करू नये. असे आवाहन देखील खगोलशास्त्रज्ञ श्रीनिवास औंधकर यांच्यावतीने करण्यात आले आहे.