खुलताबाद, (प्रतिनिधी) : वेरूळ येथील कैलास लेणी सह सर्व लेण्या व सीताची न्हाणी धबधबा, जोगेश्वरी कुंड, जोगेश्वरी माता दर्शन घेतल्याने तसेच भाविक भक्तांसह वेरूळलेण्या बघून मनाला आज शांती लाभली असल्याचे उद्गार नाथ आश्रम प्रमुख साध्वी आक्का महाराज यांनी केले.
पवित्र तीर्थ क्षेत्र वेरूळ लाखो भाविक व पर्यटक दरवर्षी भेट देत असतात. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येक भाविकाला व देश विदेशतून, येणाऱ्या पर्यटकाला सुख शांती धार्मिकतेसाठी देश सेवेसाठी भरभक्कम शक्ती देवो अशी प्रार्थना वेरूळ नाथ आश्रम प्रमुख साध्वी अक्का महाराज व भामाठाण येथील अडबंगनाथ संस्थान प्रमुख अरुण नाथगिरी जी महाराज यांनी वेरूळ भेटी दरम्यान केली. या वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, वारकरी संप्रदायाचे मराठवाडा प्रमुख नारायण भांबर्डे महाराज, कैलास मिसाळ, ज्येष्ठ नेते दामू गवळी, योगेश राजपूत, संतोष करपे, लखनगिरी महाराज, संतोष पांडव, सुखदेव ठेंगडे, सुनील मनगरे, आदी उपस्थित होते.