जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यशाला गवसणी
१८ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा सांभाळ आणि कौटुंबिक पतीसह सासू सासऱ्यांची मोलाची साथ -
सिल्लोड, (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन करता येते, हे सिल्लोड तालुक्यातील मुकपाठ येथील राणी सागर निकम यांनी सिद्ध करून दाखवले आहे.
महाराष्ट्र सिक्युरिटी अँड फॅसिलिटी सर्व्हिसेस मध्ये त्यांची निवड झाली आहे. त्यांच्या या यशाचे परिसरातून कौतुक होत आहे. घरातील जबाबदाऱ्या सांभाळतानाच अवघ्या १८ कौटुंबिक महिन्यांच्या चिमुकल्या मुलीचा सांभाळ करण्याची जबाबदारी राणी यांच्यावर होती.
अशा परिस्थितीत स्वतःच्या भविष्याचा विचार करत त्यांनी प्रयत्न सुरू ठेवले. संसार, मुलीचे संगोपन आणि स्वतः च्या ध्येयाचा पाठपुरावा करत त्यांनी मधील भरती प्रक्रियेत यश मिळवले.
या यशामागे त्यांचे पती तसेच सासू सासऱ्यांची मोलाची -
साथ लाभली. कुटुंबीयांनी मुलीच्या संगोपनासह घरातील जबाबदाऱ्यांमध्ये मदत केल्यामुळे राणी यांना स्वतःच्या ध्येयाकडे लक्ष केंद्रित करता आले.
राणी निकम यांची ही कामगिरी ग्रामीण भागातील महिलांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळतानाही इच्छाशक्ती आणि कुटुंबाचा पाठिंबा असेल, तर महिला कोणत्याही क्षेत्रात यश मिळवू शकतात, हे त्यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे.
सिल्लोड तालुक्यातील मुकपाठ गावच्या या सुनबाईच्या यशाबद्दल यशाब त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.