दिव्यांग बांधवांची स्कुटर विथ अडॅप्शन योजनेत निवड

Foto
आमदार अब्दुल सत्तार यांच्या पाठपुराव्याला यश

सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना स्वावलंबी जीवन जगता यावे यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून जिल्हा परिषद छत्रपती संभाजीनगरच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयामार्फत २०२५२६ या वर्षासाठी जिल्हा परिषद उपकर ५ टक्के अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्कुटर विथ अडॅप्शनफ्फयोजनेत मतदारसंघातील १९ दिव्यांग लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.

यामध्ये सिल्लोड तालुक्यातील १३ तर सोयगाव तालुक्यातील ६ लाभार्थ्यांचा समावेश आहे. या योजनेअंतर्गत निवड झालेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना स्कुटर उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यामुळे त्यांच्या दैनंदिन जीवनात मोठी सोय होणार आहे. मतदारसंघातील दिव्यांग बांधवांना या योजनेचा लाभमिळावा यासाठी आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्या पाठपुराव्याच्या अनुषंगाने आता लाभार्थ्यांची निवड करण्यात आली असल्याने संबंधित लाभार्थ्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

सदर योजनेचा लाभघेण्यासाठी निवड झालेल्या लाभार्थ्यांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड सोयगाव यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहनही आमदार अब्दुल सत्तार यांनी केले आहे. दरम्यान, सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील दिव्यांग बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी तसेच त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभमिळवून देण्यासाठी आपण पुढेही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही आमदार अब्दुल सत्तार यांनी दिली आहे.