सेवा संकल्प अभियानांतर्गत पानवडोद येथे शेतकरी प्रशिक्षणासह चर्चासत्र

Foto
आधुनिक तंत्रज्ञान व शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन

सिल्लोड, (प्रतिनिधी) : सेवा संकल्प अभियानांतर्गत (१७सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर) कृषी विभाग, पंचायत समिती सिल्लोड यांच्यावतीने पानवडोद बु. ता. सिल्लोड येथे शेतकरी प्रशिक्षण व चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमात शेतकऱ्यांना मिरची, टोमॅटो व इतर पिकांच्या आधुनिक लागवड तंत्रज्ञानासह शासकीय योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांबाबतही तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. कृषी विज्ञान केंद्राच्या विषय तज्ज्ञ डॉ. संजुला भावर यांनी मिरची व टोमॅटो पिकांच्या सुधारित लागवड पद्धती, पीक व्यवस्थापन व जमिनीची सुपीकता वाढविण्याच्या सेवा संकल्प अभियान शेतकरी प्रशिक्षण व चर्चा सत्र
समजावून उपाययोजना सांगितल्या. 

कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी जलतारा, महिला सक्षमीकरण अधिनियम २०२६ व कीटकनाशक फवारणी करताना घ्यावयाच्या सुरक्षिततेबाबत मार्गदर्शन केले. सहाय्यक गटविकास अधिकारी आशिष मस्के यांनी सिल्लोड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर झाल्याबाबतचा शासन निर्णय व त्यातील सवलतींची माहिती दिली.

कृषी अधिकारी सुनील सूर्यवंशी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना व राष्ट्रीय बायोगॅस कार्यक्रमाची माहिती देत शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन केले. यावेळी उत्कृष्ट
काम करणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला, तर पालोद येथील योजनेअंतर्गत पूर्ण झालेल्या विहिरींचे जलपूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

 कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य अनिल खरात, विक्रांत दौड, विठ्ठल वानखेडे, विकास दौड, निवृत्त गटविकास अधिकारी विष्णुपंत बोडखे, पी.व्ही. दौड, अरुण पाटील गावंडे, शेनफड सिल्लोडे, समाधान गायकवाड यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विश्वास बनसोडे यांनी केले. यशस्वितेसाठी जोगेंद्र अहिरराव, विस्तार अधिकारी राजेंद्र लांडगे, ग्रामपंचायत अधिकारी अजय ठाकरे व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.