'स्मार्ट कार्ड'साठी सिडको बसस्थानकावर ज्येष्ठांची फरपट !

Foto
छत्रपती संभाजीनगर, आवश्यक (सांजवार्ता ब्युरो) : एसटी महामंडळाच्या सवलतीच्या प्रवासासाठी असलेल्या स्मार्ट कार्डचे वितरण अखेर सुरू झाले खरे, मात्र प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. वितरणाचे कोणतेही योग्य नियोजन नसल्याने सिडको बसस्थानकावर ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची फरपट होत आहे. तांत्रिक अडचणींमुळे
आधीच रखडलेली कार्डे आल्याने स्थानकावर अचानक आल्यानंतर सर्वांना एकाच वेळी बोलवण्यात तासनतास तिष्ठत उभे राहण्याची वेळ लाभार्थ्यांवर आली.
एकाच मेसेजमुळे गोंधळ
एजन्सानी ही कार्डे आल्यानंतर त्याचे टप्प्याटप्प्याने वितरण करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता नोंदणी केलेल्या सर्वच लाभार्थ्यांना एकाच वेळी कार्ड
आल्याचा मेसेज पाठवण्यात आला. परिणामी शेकडो नागरिकांनी सकाळपासूनच सिडको बसस्थानकावर गर्दी केली. अचानक उसळलेल्या या गर्दीमुळे एजन्सीधारकालाही कार्डाची रीतसर नोंद घेऊन ते वितरित करणे जिकिरीचे बनले होते. दुपारपर्यंत रांगेत उभे राहूनही कार्ड न मिळाल्याने अनेक ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मनपा व एसटी प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions