पाटबंधारेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमुळे पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यान बकाल, निधीचा दुरुपयोग

Foto
रमेश लिंबोरे

पैठण उद्या विकास समितीने खासदार आमदार यांच्याकडे केलेल्या सततच्या पाठपुरामुळे संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मिळाला आहे. त्यामुळे अनेक वर्ष बंद पडलेले हे उद्यान सुरू झाले आहे. परंतु या निधीचा म्हणावा तसा उपयोग झाला नाही दुरुपयोगच जास्त झाला आहे.

उद्यान विकास समितीने सुचवलेल्या सूचनानुसार कामे करण्यात आली नाही कोणत्याही कामाचा दर्जा दर्जेदार झालेला नाही या सर्व कामाकडे पाटबंधारे खात्याचे वरिष्ठ अधिकारी यांचे दुर्लक्ष असल्यामुळे तसेच खासदार संदिपान भुमरे व आमदार विलास भुमरे यांनी उद्यानाच्या विकासासाठी निधी देऊन आपली जबाबदारी पार पाडली. परंतु सुरू असलेल्या कामाकडे त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे अधिकाऱ्यांनी संबंधित गुत्तेदारांशी हात मिळवणी करून आपल्या मनमानी पद्धतीने कामे केली आहेत त्यामुळे पुन्हा उद्यानाची बकाळ अवस्थेकडे वाटचाल सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.

उद्यान विकास समितीतर्फे नुकतीच उद्यानातील कामाची पाहणी करण्यात आली असून उद्यानात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले आढळून आले. उद्यानातील कारंजामध्ये तसेच दोन्ही कॅनलमध्ये मोठ्या प्रमाणात शेवाळ झाले आहे त्याची स्वच्छता अनेक दिवसापासून करण्यात आली नाही त्यामुळे दुर्गंधी सुटली असून पर्यटकांच्या आरोग्यास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाण्याअभावी उद्यानातील गुलाबाची, कर्दळीची तसेच इतर फुलांची झाडे जळून जात असल्याचे दिसून आले आहे तसेच १७ हजार रुपये किमतीचे अनेक खजुराची झाडे पाण्याअभावी जवळून गेली आहेत. हिरवळ सुद्धा जळून जात आहेत. पाटबंधारे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे संत ज्ञानेश्वर उद्यान ची अवस्था दिवसेंदिवस खालावत चालल्याचे चित्र समोर येत आहे. उद्यानात सर्वत्र गवत वाढलेले असून झाडांची छाटणी न झाल्यामुळे परिसर अस्ताव्यस्त दिसत आहे. 

बसण्याच्या बाकांची मोडतोड झाली असून काही ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले आहेत. ३१० एकर क्षेत्रातील संत ज्ञानेश्वर उद्यान पाहण्यासाठी दररोज हजारो पर्यटक येत आहेत. परंतु उद्यान्यात आलेल्या पर्यटकांना गैरसोईचा सामना करावा लागतो. उद्यानात पर्यटकांसाठी फक्त दोन शौचालय बांधण्यात आले असून एक उद्यानाच्या पूर्व गेट जवळ तर दुसरे तालुका कृषी विभाग च्या गेट समोर बांधण्यात आले आहे या दोन्ही शौचालया मधील अंतर जवळपास
एक ते दीड किलो मीटरचे आहे उद्यानात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. दोन्ही कॅन्टीन बंद अवस्थेत आहे त्यामुळे पर्यटनाची, महिलांची, लहान मुलांची गैरसोय होते. उद्यानात प्रकाशयोजना देखील अपुरी असल्याने सायंकाळनंतर उद्यानात जाणे नागरिक टाळत आहेत. कारण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विषारी सापांचा वावर असतो.
-- लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष ---
संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे व पैठणचे आमदार विलास भुमरे यांनी उद्यान सुरू करण्यासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे परंतु नुसता निधी उपलब्ध करून देऊन उपयोग नाही या निधीचा उपयोग योग्य प्रकारे होत आहे की नाही याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांवर नियंत्रण असणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया उद्यान विकास समितीचे संतोष गव्हाणे, संतोष गोबरे, रमेश लिंबोरे, रमेश शेळके बजरंग काळे, बाळू आहेर, शिवाजी गाडे, यांनी व्यक्त केली आहे.

--सुरक्षा रक्षकांना सहा महिन्यापासून पगार नाही --
आपले जीव धोक्यात घालून हे सुरक्षा रक्षक आपली जबाबदारी पार पाडतात. परंतु या सुरक्षा रक्षकांना गेल्या सहा महिन्यापासून पगार देण्यात आला नाही. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडलेले दिसत असून काम सोडून जाण्याच्या मनस्थितीत आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे उद्यानाची देखभाल पूर्णपणे कोलमडली असल्याचा आरोप उद्यान विकास समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

-- मंत्री राधाकृष्ण विखेंचा विकास कामांना खोडा --
संत ज्ञानेश्वर उद्यानात विकास कामे करण्यासाठी मजूर उपलब्ध नाही, तर जलसंपदामंत्री बाळासाहेब विखे पाटील यांनी उद्यानाच्या कामासाठी नवीन मोठे टेंडर काढण्यात येणार आहे. नवीन टेंडर काढल्यानंतर कामे सुरू करा, असा हट्ट धरला असल्याने अधिकारीही नवीन कामे करण्यास टाळाटाळ करताना दिसत आहेत. सहा महिन्यापासून सेक्युरिटी गार्डना पगार नाही. उद्यानाच्या सुरक्षा साठी सुरक्षा रक्षक नेमण्यात आलेले आहेत.

-- परिसरातील नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण --
या संदर्भात उद्यान विकास समितीच्या वतीने अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी केल्या असल्या तरी त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. उद्यानाची नियमित साफसफाई आणि देखभाल झाली पाहिजे. अन्यथा हे ठिकाण पूर्णपणे ओस पडेल, अशी प्रतिक्रिया उद्यान विकास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली आहे. वाढत्या तक्रारी लक्षात घेता प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन उद्यानाची स्थिती सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.