संघांचे जेष्ठ कार्यकर्ते बाबुराव थोरात पंचत्वात विलीन

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील भवन येथील भारतीय जनता पार्टीचे सर्वात जेष्ठ व संघांचे जेष्ठ कार्यकर्ते व प्रगतशील शेतकरी बाबुराव यशवंता पा. थोरात (वय ८६ वर्ष) यांचे आज बुधवारी पहाटे ४ वाजता निधन झाले आहे. 

त्यांच्यावर दुपारी भवन येथील पूर्णा नदीतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुले, १ मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते डॉ. ज्ञानेश्वर थोरात, अंकुश थोरात, सुदाम थोरात यांचे वडील होत. या अंत्यसंस्कारासाठी माजी मंत्री नामदेवराव गाडेकर, शिवाजी पाथ्रीकर, ईद्रीस मुलतानी, पांडुरंग बनकर, चेअरमन कल्याण चव्हाण ज्ञानेश्वर मोठे, सुरेश बनकर, माजी आमदार सांडू पा लोखंडे, सुधाकर दानवे, द्वारकादास पाथ्रीकर, पांडुरंग तायडे, नामदेवराव चापेसह भाजपचे पदाधिकारी, आप्तेष्ट, नातेवाईक, मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी फोनवर शोक व्यक्त केला.