‘टीम मोदी’च्या शपथविधीनंतर सेन्सेक्सचा उच्चांक

Foto

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपप्रणित एनडीए सरकारमधील केंद्रीय मंत्रिमंडळाचा गुरुवारी शपथविधी झाल्यानंतर आज शुक्रवारी शेअर बाजारातील सेन्सेक्सने उच्चांक गाठला. शेअर बाजाराचे व्यवहार सुरू होताच आज सेन्सेक्सने ४० हजारांचा आकडा पुन्हा एकदा पार केला. शुक्रवारी मुंबईत शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स २५४.२५ अंकांनी वधारुन ४००८६. २२ वर पोहोचला, तर निफ्टीतही ७९.३५ अंकांनी वाढ झाली. निफ्टीने शुक्रवारी सकाळी १२०२५.२५ चा टप्पा गाठला होता. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या महाविजयानंतर नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा गुरुवारी संध्याकाळी दिल्‍लीत पार पडला. या पार्श्‍वभूमीवर शुक्रवारी शेअर बाजारातही उत्साहाचे वातावरण दिसून आले. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स २५४.२५ अंकांनी वधारुन ४००८६.२२ वर पोहोचला. तर निफ्टीही ७९.३५ अंकांच्या वाढीसह १२०२५.२५ पर्यंत पोहोचला.