माजी खासदार विनायक राऊतांच्या सुनेचे पतीसह १२ जणांवर गंभीर आरोप, दोन भोंदू बाबांचाही समावेश

Foto
ठाणे: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने पोलीस ठाण्यात सासर्‍यासह एकूण १२ जणांविरोधात तक्रार दाखल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामध्ये रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोन भोंदू बाबांचाही समावेश आहे. पतीसह सासरच्या मंडळींकडून माझा मानसिक, शारीरिक, भावनिक छळ सुरू असून आपली फसवणूक केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. पती व माझ्यात क्लेश होण्यात सासूचा मोठा सहभाग असल्याचे पीडितेने तक्रारीत नमूद केलं आहे. ठाणे शहरातील कापूरबावडी पोलीस स्थानकात ही तक्रार दाखल झाल्याने खळबळ उडाली आहे.

राऊत यांच्या सुनेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, माझे पती, गितेश राऊत हे शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यास असक्षम असल्याचे सासरे विनायक राऊत, सासू शामल राऊत यांना माहीत असूनही त्यांनी गितेशचे माझ्यासोबत लग्न लावून दिले. तसेच सासू शामल राऊत हिने मला घरातील जेवण, देवपूजा व इतर बाबींवरून मानसिक त्रास देऊन, मासिक पाळी पुढे करण्यासाठी सातत्याने गोळ्या घेण्यासाठी भरीस पाडून माझी तब्बेत बिघडवण्यास कारणीभूत झाल्या. तसंच वेगवेगळ्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करत असताना ते ईलाज नाकारून मला होम इन्सेमिनेशन हा पर्याय करण्यावर दबाव टाकून मला खूप त्रास दिला आहे. असा माझा शारीरिक, मानसिक, भावनात्मक छळ करून, माझे आर्थिक खच्चीकरण करून आणि माझ्यावर अनेक अघोरी इलाज करून माझा अमानुष छळ केला आहे,ङ्घङ्घ असा आरोप करत पीडितेने पती-गितेश राऊत, सासू व सासरे शामल राऊत व विनायक राऊत, तसेच लग्न जुळवणारे गितेश राऊत याची सख्खी आत्ते बहीण सुरेखा राजेश सरफरे आणि तिचे पती राजेश सरफरे यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

जगभर फिरलो, पण संबंध ठेवले नाहीत...
पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत पीडितेने गंभीर आरोप केले आहेत. ङ्गङ्घलग्न झाल्यापासून आजपर्यंत महाराष्ट्र, ऊटी, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, स्वित्झर्लंड, नॉर्वे, दुबई, केनिया, थायलंड अशा देशांत फिरायला गेलो असता तिथेही पतीने माझ्यासोबत संबंध ठेवले नाहीत. त्याबाबत विचारणा केल्यास मला सातत्याने शिवीगाळ करून मारहाण केली, असे तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेनं गंभीर आरोप करत पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने खळबळ उडाली असून याप्रकरणी पोली अधिक तपास करत आहेत.