सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड, सोयगाव तालुक्यात प्रशासकीय सेवेत कार्यरत राहून प्रदीर्घ काळ जनतेची सेवा बजावलेल्या अधिकाऱ्यांचा सेवापूर्ती व सेवा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
सिल्लोड शहरातील डोंगरगाव फाटा परिसरातील स्वस्तिक लॉन्स येथे आयोजित या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी आमदार अब्दुल सत्तार होते. यावेळी उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण, पोलीस उपाधीक्षक शेषराव उदार, जलसंपदा विभागाचे उपअभियंता राजधर दांडगे, जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता दिलीप फुलारी, प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे उपअभियंता उमेश लिंबारे, सहायक महसूल अधिकारी शिवाजी सोनवणे तसेच पोलीस भागातील एएसआय सुरेश सेवापुर्ती व सेवागौरव सोहळा :
तायडे या सेवानिवृत्त अधिकाऱ्यांचा पुष्पगुच्छ, शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार यांनी वानिवृत्त अधिकाऱ्यांच्या कार्याचा गौरव केला. कार्यक्रमास केशवराव तायडे, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, देविदास लोखंडे, रामदास पालोदकर, राजू बाबा काळे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक दामू अण्णा गव्हाणे, नानासाहेब रहाटे, शेख जावेद, जयराम चिंचपुरे, फिरोज पटेल, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, सुधाकर पाटील, विनोद मंडलेचा, शंकरराव खांडवे, राजेंद्र ठोंबरे, सयाजीराव वाघ, सय्यद नासिर हुसेन, अकील वसईकर, सिद्धेश्वर आहेर, शेख इमरान उर्फ गुड्डू, सत्तार हुसेन, संजय डमाळे, मनोज झंवर, प्रशांत क्षीरसागर, मुक्ताराम पाटील, अनिल पालोदे, पं. स. सदस्य शेख सलीम, शमी चाऊस, राजू मिया देशमुख, रामेश्वर सुरडकर, डॉ. फिरोज खान, मधुकर गवळी, अंबादास सपकाळ, रमेश प्रभाकर पारधे, बबलू पठाण, अक्षय काळे, संतोष बोडखे, गोपीचंद जाधव, राजीव गौर, अक्षय मगर आदी उपस्थित होते.