गोळीबारप्रकरणी ७ आरोपींना ठोकल्या बेड्या

Foto
छत्रपती संभाजीनगर,(सांजवार्ता ब्युरो) : कुख्यात गुंड शुभम जाटने जुन्या वादातून एकाच्या घरावर हल्ला करून थेट पिस्तुलाने गोळीबार केला होता. यात कुणी जखमी झाले नाही. परंतु या प्रकाराने परिसरात मोठी दहशत निर्माण झाली. गोळीबारानंतर शुभम एका घराच्या गच्चीवरील पाण्याच्या टाकीत लपला होता. पुंडलिकनगर पोलिसांनी शोध त्याला टाकीतून बाहेर काढून अटक केली. शिवाय अन्य सहा जणांना अटक केली.

याबाबत सचिन बाली लाहोट (वय ३५, रा. शिवशाहीनगर मुकुंदवाडी) यांनी तक्रार दिली. त्यानुसार ते कंत्राटी सफाई कामगार म्हणून काम करतात. ते कुटुंबासह राहतात. दरम्यान, सोमवारी (दि.१९) सकाळी ते घरी झोपलेले असताना शिवीगाळ आणि आरडाओरड करण्याचा आवाज आला. त्यांनी व त्यांच्या आईने खिडकी उघडून पाहिले तेव्हा त्यांच्या परिचयाचा शुभम जाट (रा. बीड बायपास), मयूर - संजय उनगे, शिवा ऊर्फ छोट्या रमेश विजय धनई, मनोज पडूळ भालेराव, गोल्या उर्फ विजय दिनकर धनई, मनोज संजय पडूळ, सागर राऊत, अमर ऊर्फ अतुल पवार हे घराबाहेर दिसले. ’साचिन बाहर आजा, आज तुझे खतम करना है,’ असे मोठमोठ्याने ओरडत होते. 
जाटच्या हातात पिस्तूल तर इतरांच्या हातात तलवार, चाकू होते. दरवाजा उघडत नसल्याने विजयने दरवाजावर मोठा दगड मारला. भीतीमुळे कुणी घराबाहेर पडले नाही तेव्हा जाटने गोळीबार केला. गोळीबारामुळे या ठिकाणी गर्दी झाली. तेव्हा आरोपींनी कोई बीच में आया तो जान से मार देंगे’ अशी धमकी दिली. तेव्हा लाहोट यांना लक्षात आले, की त्यांची काकू शोभा विनोद लाहोट (रा. जयभवानीनगर गल्ली नंंबर १४) आणि नातेवाईक अजय कागडा आणि जाट यांच्यातील जुन्या वादाचा राग मनात धरून त्यांना ठार मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आला. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सातही जणांना ताब्यात घेत अटक केलो. यातील संशयित आरोपी जाटवर दहा गुन्हे दाखल आहेत. अमर पवारवर तीन गुन्हे दाखल आहेत, त्यात एक खुनाच्या गुन्ह्याचा समावेश आहे. मयूर उत्ते याच्यावरही खुनाच्या प्रयत्नाचा आणि विजयवरही खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे.

पुंडलिकनगर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अर्जुन राऊत हे सुनील म्हस्के, पोलिस हेडकॉन्स्टेबल प्रकाश डोंगरे, शिवाजी शिंदे, पोलिम कॉन्स्टेबल संदीप बीडकर, अजय कांबळे, विलास साळुंके, अंकुश वाघ हे तपासासाठी घटनास्थळी गेले. तेव्हा त्यांना आरोपी बीडबायपास परिसरात असल्याची माहिती मिळाली.