लांडग्याच्या हल्ल्यात सात शेळ्या ठार

Foto
फुलंब्री, (प्रतिनिधी) गट क्रमांक ३०९ मध्ये सोमवारी मध्यरात्री लांडग्याच्या हल्ल्यात सात शेळ्या दगावल्या, तर एक शेळी गंभीर जखमी झाली.
किशोर शिवाजी नागरे यांचे एक लाखांचे नुकसान झाले आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरे यांच्या शेळ्या लोखंडी जाळीच्या कुंपणात सुरक्षित बांधलेल्या असतानाही लांडग्याने जाळीच्या खालून आत शिरत हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे शेळ्यांचा आवाज ऐकून नागरे यांना जाग आली.

त्यांनी तत्काळ धाव घेतल्याने एक शेळी वाचविता आली; मात्र तीही जखमी आहे. आठपैकी सात शेळ्या दगावल्याने नुकसान झाले. वन विभागाचे अधिकारी शेख यांनी घटनास्थळ पंचनामा केला. बाबरा अधिकाऱ्यांनी पशुवैद्यकीय शवविच्छेदन केले. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात व नुकसानग्रस्त शेतकऱ्याला त्वरित भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.