अल्पवयीन छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) चुलत बहिणीवर अत्याचार करून तिला गरोदर करणाऱ्या नराधम भावाला पोक्सो न्यायालयाच्या विशेष न्यायाधीश शिल्पा तोडकर यांनी आजन्म कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
फिर्यादीनुसार, तिच्या चुलत भावाने नोव्हेंबर २०२२ मध्ये शेतातील शेडमध्ये नेऊन अत्याचार करीत कुटुंबीयांनी धमकी दिली. यानंतर अनेकदा तिच्यावर अत्याचार केला. ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी दिवाळीच्या आदल्या दिवशी पुन्हा धमकी देऊन अत्याचार केला. ६ जानेवारी २०२५ रोजी पोट दुखत असल्याने अल्पवयीन मुलीस खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी पीडिता ३२ आठवड्यांची गरोदर असल्याचे समोर आले. आईवडिलांनी विचारणा केल्यावर त्या मुलीने तिच्यासोबत घडलेली घटना सांगितली. या प्रकरणी देवगाव रंगारी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. एपीआय ज्ञानेश्वर सीताराम साखळे आणि प्रभारी अधिकारी एपीआय सिध्देश्वर गोरे यांनी तपास केला. ८ जानेवारी २०२५ रोजी ३० वर्षीय चुलत भावाला अटक करण्यात आली. सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपीस दोषी ठरवत आजन्म कारावास आणि ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. अतिरिक्त जिल्हा सरकारी वकील अॅड. ज्ञानेश्वरी नगुला यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून पोलीस उपनिरीक्षक एम. ए. मोरे, विद्या चव्हाण आणि शिला घुगे यांनी काम पहिले.
https://epaper.sanjwarta.in/
Powered By: Vrudhee Solutions













