विशेष हेरिटेज वॉकला नागरिकांचा प्रतिसाद
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : सातारा गावातील प्रसिद्ध खंडोबा मंदिराचा इतिहास, आख्यायिका, परंपरा आणि सांस्कृतिक वारशाची नव्याने ओळख करून देण्यासाठी 'शहरनामा'तर्फे शनिवारी खास ज्येष्ठ नागरिकांसाठी चौथा हेरिटेज वॉक आयोजित करण्यात आला. खंडोबाच्या बारा स्थानांपैकी सातवे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या मंदिराला ऐतिहासिक व धार्मिक परंपरा आहे.
हेरिटेज वॉकची सुरुवात मंदिराजवळील सुमारे तीनशे वर्षे जुन्या दांडेकर वाड्यापासून झाली. संदीप दांडेकर यांनी वाड्यातील पेशवेकालीन उजव्या सोंडेच्या गणपतीची माहिती दिली. या गणपतीची दांडेकर कुटुंबातील सहा पिढ्यांपासून पूजा केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. इतिहास अभ्यासक उमेश पटवर्धन यांनी ही मूर्ती
पहिल्या बाजीराव पेशव्यांच्या पूजेतील असल्याचे सांगितले. नारायण दीक्षित यांच्या भक्तीशी संबंधित खंडोबा मंदिराच्या स्थापनेची आख्यायिका यावेळी सांगण्यात आली. मूळ मंदिर कडेपठारावर असून सध्याचे मंदिर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी सुमारे १७६६ मध्ये बांधल्याची माहिती पटवर्धन यांनी दिली. मंदिराचे पुजारी
खंडोबाच्या गोंधळाने समारोप
▶ दांडेकर वाडा, गणपती बारव आणि खंडोबा मंदिराला यावेळी भेट देण्यात आली. मंदिरातील आरतीनंतर खंडोबाच्या आख्यानावर आधारित गोंधळाने वॉकचा समारोप झाला. इतिहास अभ्यासक उमेश पटवर्धन, पुरातत्वचे आशुतोष पाटील, सुनील सुतवणे, रमाकांत रौतल्ले, स्नेहल पाटील, श्रीनिवास औंधकर, प्रमोद भेंडे, राजश्री अग्रवाल, साहेबराव पळसकर, विजय सोनवणे आदी उपस्थित होते. वारसास्थळांना भेट देऊन इतिहास जिवंत ठेवण्याचे आवाहन 'शहरनामा' टीमने केले.
विशाल धुमाळ यांनी खंडोबा-म्हाळसा देवी, तसेच कडेपठारावरील बाणाई देवीशी संबंधित माहिती दिली.












