मुंबई : महाराष्ट्राचे ज्येष्ठे नेते तथा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना नुकताच मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयातून डिस्चार्च देण्यात आला आहे. शरद पवार यांना दोन दिवसांच्या उपचारानंतर डिस्चार्ज मिळालेला आहे. गुरुवारपासूनच पवारांच्या भेटीला नेत्यांची रीघ लागलेली होती. अनेक दिग्गज नेत्यांनी रुग्णालयात त्यांची भेट घेतलेली आहे, तसेच त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केलेली आहे. दरम्यान, शरद पवार रुग्णालयातून थेट त्यांच्या निवासस्थानी सिल्वर ओककडे रवाना झालेले आहेत.
डॉक्टरांनी काय माहिती दिली?
शरद पवारांची प्रकृती सध्या स्थिर आहे. खरंतर, जेव्हा खोकला सुरु झाला, तेव्हा पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. याठिकाणी शरद पवारांचे सातत्याने महिन्यातून एकदा उपचार सुरु असतात. म्हणूनच त्यांना या रुग्णालयात दोन दिवस आराम करण्यासाठी आणण्यात आलं होतं. त्यांना खोकला आणि कपचा त्रास सुरु होता, परंतू आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी आणि सुप्रिया सुळेंनी देखील दिली आहे.