मुंबई : कॉकरोच जनता पार्टीचे नेते अभिजीत दीपके यांनी निवडणूक आयोगातील कथित घोटाळ्याच्या विरोधात मुंबईत जेलभरो आंदोलनाची घोषणा दिली आहे. या जेलभरो आंदोलनात राज्यातूनच नव्हे तर देशातून जेनजी येणार असल्याचं सांगितलं जात आहे. या मोर्चाच्या एक दिवसाआधीच शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसने मोठा निर्णय घेतला आहे. शरद पवार यांनी दीपके यांच्या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे दीपके यांचं बळ अधिकच वाढलं आहे. मात्र, पवार या मोर्चामध्ये सामील होणार की नाही हे अद्याप गुलदस्त्यात आहेत.
शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही मोठी घोषणा केली आहे. उद्या २ तारखेला अभिजीत दीपके यांच्या नेतृत्वात मुंबईत जेलभरो आंदोलन होणार आहेत. तसेच येत्या ४ तारखेला ठाकरे बंधूंचा मोर्चा होणार आहे. या मोर्चालाही आमचा पाठिंबा असणार आहे, असं खासदार सुप्रिया सुळे यांनी आज स्पष्ट केलं. मात्र, या दोन्ही मोर्चात राष्ट्रवादीचे नेते सहभागी होणार की नाही याबाबतची माहिती त्यांनी दिली नाही. त्यामुळे या दोन्ही मोर्चांमध्ये शरद पवार सामील होणार का? याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.
उद्धव आणि राज ठाकरेंचाही पाठिंबा
दरम्यान, उद्या होणार्या अभिजीत दीपके यांच्या मोर्चाला ठाकरे बंधूंनीही पाठिंबा दिला आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा पाठिंबा दर्शवला आहे. अभिजीत दीपके यांनी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन केलं होतं. त्याला आम्ही पाठिंबा दिला होता. यावेळीही त्यांनी मुंबईत आंदोलन पुकारलं आहे. आमचा त्यालाही पाठिंबा आहे. आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तर प्रत्येकाने मोर्चे, आंदोलनं केली पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी पुढे आलं पाहिजे. लोकशाही वाचवण्यासाठी पुढे येणाार्या प्रत्येकाला आमचा पाठिंबा आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाने ठाकरे बंधूंनी पुकारलेल्या मोर्चाला आपला पाठिंबा दर्शवला आहे. यापूर्वीच काँग्रेसनेही या मोर्चात सहभागी होणार असल्याचे नाना पटोले यांच्या माध्यमातून स्पष्ट केले होते. त्यामुळे ठाकरे बंधूंच्या या मोर्चाला दोन्ही प्रमुख विरोधी पक्षांचा पाठिंबा लाभला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, च्या मोर्चाला देखील राष्ट्रवादी काँग्रेसचा (शरदचंद्र पवार गट) पाठिंबा राहणार आहे. यामुळे विविध सामाजिक आणि राजकीय मुद्द्यांवर विरोधकांची एकजूट दिसून येत आहे.