शेंद्रा एमआयडीसीतील स्क्रॅपचे गोदाम जळून खाक; सुदैवाने जीवित हानी टळली

Foto
 औरंगाबाद: औरंगाबाद-जालना रोडवरील थ्री स्टार शेंद्रा एमआयडीसीत आज दुपारी एक वाजेच्या सुमारास स्क्रॅपच्या गोदामाला भीषण आग लागली.  यात लाखो रुपयांचे नुकसान झाले असून सुदैवाने जीवित हानी झाली नाही. 

 करमाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ५ स्टार शेंद्रा एमआयडीसीत  कंपन्यांच्या मालाचे गोडाऊन आहेत.  त्यातील स्क्रॅपच्या  गोडाऊनला आज दुपारच्या सुमारास अचानक आग लागली.  बघता बघता आगीने रौद्र रूप धारण केले.  तेथील सुरक्षारक्षकांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  मात्र, त्यांना त्यात यश आले नाही.  अखेर सुरक्षारक्षकांनी अग्निशामक दलाशी संपर्क साधून बोलावून घेतले.  अग्निशामक दलाच्या तीन बंबांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.  अखेर तीन वाजता आज विझवण्यात यश आले.  आग कशी लागली याचे कारण मात्र अद्याप  अस्पष्ट आहे.  या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असण्याचा अंदाज आहे.  सुदैवाने इतर गोडाऊनला आग लागली नाही नाहीतर मोठ्या प्रमाणात  झाली असती.