शेंद्रा ते ढोरेगाव महामार्गाचा मार्ग मोकळा ७४५ कोटींच्या निधीला तत्त्वतः मंजुरी; लवकरच भूसंपादन

Foto
अर्थसंकल्पात घोषणा
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन आणि पुढे ढोरकीनपर्यंतच्या प्रस्तावित सहा पदरी महामार्गासाठी काही दिवसांतच भूसंपादन प्रक्रिया करण्यात येणार आहे.
यासाठी दोन टप्प्यांत ७०.६० किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी हे भूसंपादन करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात ३१५ कोटी रुपये तर दुसऱ्या टप्प्याच्या भूसंपादनासाठी ४३० कोटी अशा एकूण ७४५ कोटी रुपयांचा
▶ भूसंपादनासाठी पहिल्या टप्प्यात ३१५ कोटी रुपये आणि दुसऱ्या टप्प्यातील भूसंपादनासाठी ४३० कोटी अशा ७४५ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यासंदर्भात राज्य सरकारने तत्त्वतः मान्य केल्याचा आदेश पाच डिसेंबर २०२५ रोजी जारी केला होता. त्यानंतर अर्थसंकल्पात त्यासाठी तरतूद केल्याची घोषणा करण्यात आली. ग्रीनफील्ड रस्त्याच्या पहिल्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर शेंद्रा डीएमआयसीअंतर्गत करमाड ते बिडकीन सहापदरी रस्ता ३४.८० किलोमीटरचा हा रस्ता असेल. टप्पा दोनमध्ये बीडकीन ते ढोरेगाव (पुणे-नगर रस्ता) हा सहापदरी ३५.८० किलोमीटरचा रस्ता असून, दोन्ही रस्त्यांच्या अलाइमेंटसाठी तत्त्वतः मान्यता देण्यात आली.
निधीला शासनाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे.
जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, शेंद्रा डीएमआयसी ते बिडकीन हा ३५.८० किलोमीटरचा टप्पा एक आणि बिडकीन एमआयडीसी ते ढोरेगाव हा ३४.८० किलोमीटरचा टप्पा दोन असणार आहे. या
औद्योगिक क्षेत्र विकासाच्या दृष्टीने या रस्त्याचे बांधकाम करण्यात येणार असून यासाठी दोन टप्प्यांत एकूण ७०,६० किलोमीटरपर्यंत दोन्ही बाजूंनी भूसंपादन करावे लागणार आहे. भूसंपादनाची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येईल.
https://epaper.sanjwarta.in/Powered By: Vrudhee Solutions