शेतातील कापसाची झाडे अज्ञाताने उपटली; शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : विशाल बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित आयकॉन पॅराडाईज इंग्लिश स्कूल तालुक्यातील कायगाव येथील शेतकरी राजू तुकाराम खोडके (४५) यांच्या टाकळी शिवारातील २६ गुंठे शेतातील कापसाची झाडे अज्ञात व्यक्तीने लबाडीच्या इराद्याने बुधवारी मध्यरात्री उपटून फेकल्याची घटना घडली. 

या प्रकारामुळे शेतकऱ्याचे जवळपास एक लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. राजू खोडके यांनी मोठ्या कष्टाने कापसाची लागवड केली होती. कापसाची झाडे मोठी होऊन पीक बहरात आले असतानाच अज्ञात व्यक्तीने संपूर्ण झाडे उपटून फेकल्याने त्यांचे मोठे नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच त्यांनी वडोद बाजार पोलिस ठाण्यासह सिल्लोड तालुका कृषी अधिकारी व तहसील कार्यालयात तक्रार केली.

गुरुवारी दुपारी पोहेकॉ. सपकाळ व महसूल अधिकारी काथार यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. कष्टाने उभे केलेले पीक नष्ट झाल्याने शेतकऱ्यावर आर्थिक संकट ओढवले असून, शासनाने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी राजू खोडके यांनी केली आहे.