शिल्पा शेट्टीने लगावली कानशिलात

Foto
बॉलिवूडमधील प्रसिद्ध जोड्यांपैकी एक जोडी म्हणजे अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांची आहे. शिल्पा शेट्टी अभिनेत्री असल्याने नेहमी चर्चेत असते. तर राज कुंद्रा प्रसिद्धीपासून नेहमी दूर असतो. पण शिल्पा शेट्टीमुळे त्यांच्या जोडीची सोशल मीडियावर कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चा सुरु असते. यावेळीही तसेच झाले आहे. शिल्पा शेट्टीमुळे राज कुंद्राचे नाव चर्चेत आले असून त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत शिल्पा शेट्टी पती राज कुंद्राला कानाखाली लगावताना दिसत आहे.
झालेय असे की, राज कुंद्रा नुकताच टीकटॉकवर सक्रीय झाला आहे. फक्त तीन महिन्यांपुर्वीच त्याने टीकटॉकवर आपले अकाऊंट सुरु केले आहे. टीकटॉकच्या माध्यमातून राज कुंद्रा अनेक व्हिडीओ शेअर करत असतो. यावेळी शेअर केलेल्या एक व्हिडीओत शिल्पा शेट्टी राज कुंद्राच्या कानाखाली लगावताना दिसत आहे. इतकेच नाही तर अवकातीत राहा माझा पती आहेस असं सुनावतानाही दिसत आहे. राज कुंद्रा याचे टीकटॉकवर तीन महिन्यात दहा लाख फॉलोअर्स झाले आहेत. यामुळे राज कुंद्राचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. टीकटॉकवर एक व्हिडीओ शेअर करत त्याने आपला हा आनंद साजरा केला आहे. या व्हिडीओत कॉमेडीयन कपिल शर्मा, अभिनेता रितेश देशमुख, आर. माधवन सारखे अनेक जण फक्त तीन महिन्यात दहा लाख फॉलोअर्स झाल्याबद्दल आश्चर्य व्यक्त करत आहेत. व्हिडीओच्या शेवटी राज कुंद्रा ‘ना हम अमिताभ, ना दिलीप कुमार, ना किसी हिरो के बच्चे’ असे गाणे म्हणत थिरकताना दिसत आहे. याचवेळी शिल्पा शेट्टी येऊन त्याच्या कानशिलात लगावते आणि ‘अवकातीत राहा, माझा नवरा आहेस’, असे म्हणते. त्यावर राज कुंद्रा मी कुठे नकार दिला आहे असं म्हणतो. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्राचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा 22 नोव्हेंबर 2009 विवाहबंधनात अडकले. राज कुंद्रा एक व्यवसायिक आहे.

Jewelroof by RC Bafna JewellersShare Business Card - Free Digital Card Maker