सरस्वती विद्यालयात शिवजयंती जल्लोषात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तळणी येथील सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथे अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रम झाला.

देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि सांस्कृतिक रंगत यांचा सुंदर संगम या कार्यक्रमात पाहायला मिळाला. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य अशोक गरूड होते. तर सतीश देशमुख हे प्रमुख व्याख्याते म्हणून उपस्थित होते. आपल्या प्रभावी व अभ्यासपूर्ण व्याख्यानातून त्यांनी 5 शिवरायांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्य स्थापनेच्या प्रेरणादायी इतिहासाचा ऊहापोह केला. त्यांच्या विचारांनी विद्यार्थिनींमध्ये इतिहासाबद्दल अभिमान आणि प्रेरणा निर्माण झाली. कार्यक्रमाची शोभा वाढविताना विद्यालयतील विद्यार्थ्यांचे शिक्षक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिकात्मक आकर्षक, लक्षवेधी व सुसंगत रैली काढण्यात आली होती, 

ज्यामुळे शिवकालीन वातावरणाची अनुभूती निर्माण झाली. शिक्षक रमेश राजगुरू व मयुर साखळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक विषयावर माहिती सादर सादर करत उपस्थितांना प्रेरित केले. सूत्रसंचालन जनार्दन कुंटे यांनी तर आभार प्रदर्शन हिरे यांनी केले. या प्रसंगी शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आदी पालक उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाण आणि शिवचरित्रातून प्रेरणा घेण्याची भावना दृढ झाल्याचे सर्वत्र व्यक्त करण्यात आले.