शिवसेना महिला आघाडीच्यावतीने शासकीय क्षेत्रात कार्यरत महिलांचा सत्कार

Foto
पैठण, (प्रतिनिधी) शिवसेना महिला आघाडीच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजवणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांचा सत्कार शिवसेना महिला आघाडीच्या वतीने करण्यात आला. पैठण तालुक्यात सर्वच पदांवर महिला अधिकारी आहेत.

झालेल्या निवडणुका असो किंवा नाथषष्ठी उत्सव असो या सगळ्यामध्ये महिला अधिकाऱ्यांनी जीव ओतून कौतुकास्पद कामगिरी बजावली असल्याने त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा, या उद्देशाने शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख पुष्पा गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात आला.

याप्रसंगी पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना तहसीलदार ज्योती पवार, गट विकास अधिकारी मनोरमा गायकवाड, नायब तहसीलदार वैशाली कांबळे, सहायक पोलीस निरीक्षक जनाबाई सांगळे, कविता जगताप, कृष्णा शिंदे, मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे या विविध क्षेत्रातील शासकीय अधिकाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

 यावेळी पंचायत समिती सभापती वैशाली बोंबले, नगराध्यक्ष विद्या कावसानकर, तालुकाप्रमुख ज्योती पठाडे, शहर प्रमुख वैशाली परदेशी, भाजप जिल्हाध्यक्ष अश्विनी लाखमले, रेखा झारगड, अर्चना गव्हाणे, सविता गव्हाणे, क्रांती गव्हाणे, राधा जाधव, विजया गिरी यांच्यासह इनरव्हील क्लबच्या महिला भगिनी उपस्थित होत्या.