पैठण, (प्रतिनिधी) : नुकत्यात झालेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत विहामांडवा गटात जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेचे नवखे उमेदवार नितीन तांबे पाटील यांनी विरोधी पक्षाच्या मातब्बर उमेदवारांचा दणदणीत पराभव केला.
मागील ३० वर्षांपासून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला विहामांडवा गट यावेळेस शिवसेनेने काबीज केला आहे. तसेच पंचायत समिती केकत जळगाव गणात प्रदीप नरके व विहामांडवा गणांत प्रमोद पन्हाळकर यांनी विरोधी उमदेवारांचा मोठ्या फरकाने पराभव केला.
जिल्हा परिषद निवडणुकीत विहामांडवा गटात सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेसची ३० वर्षाची मक्तेदारी संपुष्टात काँग्रेस चे उमेदवार विनोद तांबे यांच्या बाजूने एकतर्फी वाटणारी निवडणूक खा. संदीपान भुमरे आमदार विलास भुमरे यांचे अचूक नियोजन, मार्केट कमिटी सभापती राजुनाना भुमरे, शिवराज भैय्या भुमरे यांचे अथक परिश्रम यांची योग्य सांगड होऊन सर्वच्या सर्व उमदेवार मोठ्या फरकाने निवडून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप पुरस्कृत अपक्ष, व इतर अनुभवी अपक्ष उमदेवार यांना यावेळी परभवाचा सामना करावा लागला. जिल्हा परिषद साठी निवडणुकीचा कोणताही अनुभव नसताना शिवसेनेचे उमदेवार नितीन तांबे पाटील यांनी प्रचार करताना प्रत्येक मतदारापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला.
त्यांना गटातील सर्व गावात वयक्तिक संपर्क निवडणुकीत कामी आला.
सामान्य जनतेला आपला माणूस आपल्या विकासाठी कायम उपलब्ध राहील ही जनतेच्या मनातील मतदान करताना निर्माण झालेली भावना या निवडणुकीत दिसून आली. विरोधकांनी तसेच पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनेक अफवा, अपप्रचार, केला सुरुवातीपासून तिसऱ्या क्रमांकावर असलेले नितीन तांबे हे मात्र खा. संदीपान भुमरे यांनी घेतलेल्या सभेनंतर निवडणुकीचे चित्रच पालटले.
एक सामान्य व्यवसायिक असलेले नितीन तांबे पाटील यांना विहामांडवा गटातील जनतेने भरभरून मतदान केले. सतत तीन तीन टर्म झेडपी सदस्य व सभापती राहिलेले विनोद तांबे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल जाधव यासह, तालुका आणि जिल्ह्याचे राजकारण करणारे मातबर पुढायाँना जनतेने अक्षरशः झिरकाडले.
भाजप पुरस्कृत भाऊसाहेब काळे यांनी स्थानिक सेनेच्या नाराज गटाच्या माध्यमातून त्यामानाने चांगली लढत दिली. निवडणुकी दरम्यान झालेले तर्क, अंदाज हे काही वेगळेच होते. खाजगीत सत्तेतील काही तथाकथीत पुढारी, नाराज इच्छुक सेनेचा उमेदवार तीन नंबरला राहील म्हणून अफवा करीत होते. परंतु या सर्व अफवा खासदार संदीपान भुमरे, आ. विलास भुमरे यांच्या नियोजनाने फेल ठरल्या.
तालुक्यातील इतर सर्कल पेक्षा विहामांडवा गटाची निवडणुक आश्चर्य कारक ठरली. एखादा उमदेवार किती ही ताकदवर व अनुभवी असला तरी जनतेने निवडणूक हातात घेतली कि सामान्य माणूस सुद्धा निवडून येऊ शकतो हे यावेळेस दिसून आले.












