आमदार अब्दुल सत्तार यांनी केलेल्या विकासकामांबाबत उपस्थितांना दिली माहिती
सिल्लोड, (प्रतिनिधी) : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या अनुषंगाने घाटनांद्रा ता. सिल्लोड येथे आयोजित शिवसेना कार्यकर्ता व आढावा बैठकीस नागरिकांचा व शिवसैनिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या बैठकीत सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
यावेळी बोलताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, आगामी निवडणुकीत शिवसेना उमेदवाराला सर्वाधिक मतांनी निवडून आणावे, असे आवाहन त्यांनी कार्यकर्ते व नागरिकांना केले. सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध विकासकामांची माहिती देत त्यांनी
पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर दिला.
बैठकीदरम्यान स्थानिक प्रश्न, विकासकामांचा आढावा तसेच पुढील रणनीती यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमात प्रारंभी आमदार अब्दुल सत्तार यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमास जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन पा. गाढे, सेवानिवृत्त विभागीय निबंधक देविदास पालोदकर, माजी उपसभापती अजीज बागवान यांच्यासह माजी जि. प. सदस्य कौतिकराव मोरे, युसूफमिया देशमुख, शिवनाथ चौधरी, यासीन तडवी, कचरू मोरे, शेख मुश्ताक, इस्माईल रसूल, मोहसीन पठाण, दिलीप मोरे, दत्ता जोशी, कृष्णा मोरे, संतोष बिसेन, आकाश गुळवे, अक्रम देशमुख, मुजीब मुल्ला, पिंटूशेट कोठावळे, शेख इब्राहीन, फकिरा देशमुख आदी शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.















