सिल्लोड, (प्रतिनिधी): जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या नवनिर्वाचित जि. प. व पं. स. सदस्यांचा सत्कार सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. शहरातील शिवसेना भवन परिसरात हा कार्यक्रम झाला.
यावेळी आमदार अब्दुल सत्तार यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळात लोकांची सेवा करण्यास कमी पडू नका, जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याचे आवाहन केले. आपण विकासाला मतदान मागितले. त्यामुळे विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. आमदार अब्दुल सत्तार यांनी आपल्या भाषणात मतदार, कार्यकर्ते आणि समर्थकांचे मनःपूर्वक आभार मानत नवनिर्वाचित सर्व सदस्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
मतदारांनी दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी आहे. गावागावातील रस्त्यांची दुरुस्ती, शुद्ध पिण्याच्या पाण्याची उपलब्धता, शिक्षणाच्या दर्जात सुधारणा, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधा सक्षम करणे, महिला सक्षमीकरण तसेच युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करणे, या मुद्द्यांवर ठोस आणि नियोजनबद्ध काम झाले पाहिजे. नवनिर्वाचित सदस्यांनी विकासकामांमध्ये पारदर्शकता आणि समन्वय ठेवावा, असेही त्यांनी सांगितले. जनतेने दिलेला कौल हा विकासासाठी आहे.
त्यामुळे सर्वांनी एकत्रितपणे काम करावे,
गावपातळी वरील निवडणूक असो की मोठी प्रत्येक निवडणुकीत शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी पक्ष बांधणी करून महिला संघटन व युवकांची मजबूत फळी निर्माण करा असे आवाहन त्यांनी केले. पुढे बोलत असताना आमदार अब्दुल सत्तार म्हणाले की, मतदारांनी विकास, पारदर्शकता आणि जनहिताच्या कामांवर शिक्कामोर्तब केले आहे. मतदारांनी दिलेला कौल हा विकासाच्या अपेक्षेने दिलेला आहे; त्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घ्या, ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे शिवसेनेचे धोरण अंमलात आणून सर्वसामान्यांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून द्या.
विकास करून दाखवू : अब्दुल आमेर
याप्रसंगी नवनिर्वाचित जि. प. सदस्य अब्दुल आमेर अब्दुल सत्तार यांनी मनोगत व्यक्त करताना निवडणूक काळात विरोधकांनी केलेल्या जातीपातीच्या राजकारणाचा समाचार घेतला. आमदार अब्दुल सत्तार यांच्या नेतृत्वाखाली विकासाला मतदान मागितले, विकास करून दाखवू, मतदारांच्या विश्वासाला तडा जावू देणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नगराध्यक्ष अब्दुल समीर, अर्जुन गाढे, केशवराव तायडे, रामदास पालोदकर, तसेच मंगला तायडे, निकिता तायडे आदींनी आपल्या भाषणात मतदार, शिवसेना पदाधिकारी, कार्यकत्र्यांचे आभार मानले.
यांची होती विशेष उपस्थिती :
व्यासपीठावर तालुकाप्रमुख केशवराव तायडे, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, जिल्हा बँकेचे चेअरमन अर्जुन गाढे, जि. प. चे माजी सभापती राजेंद्र राठोड, माजी जि. प. अध्यक्ष श्रीराम महाजन, कृउबा समितीचे सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, संचालक दामू अण्णा गव्हाणे, नंदकिशोर सहारे, राजाराम पाडळे, शेख जावेद, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, माजी उपनगराध्यक्ष विनोद मंडलेचा, शिवसेना जिल्हा संघटक सुदर्शन अग्रवाल, उपजिल्हाप्रमुख किशोर अग्रवाल, शहरप्रमुख मनोज झंवर, माजी जि. प. सदस्य मुरलीधर काळे, कौतिकराव मोरे, डॉ. संजय जामकर, राजू बाबा काळे, रउफ बागवान, अजिजसेठ बागवान, नवनिर्वाचित जिल्हा परिषद मंगला केशवराव तायडे, आशाबाई अर्जुन गाढे, अब्दुल आमेर अब्दुल सत्तार, देविदास माणिकराव पालोदकर, आयेशा सय्यद नासिर हुसेन, निकिता राजेंद्र काळे तसेच पंचायत समितीच्या नवनिर्वाचित सदस्य जया सतीश ताठे, सुरेखा आनंदा शिंदे, सोफिया इब्राहिम शेख, रघुनाथ मोरे, रजनी नगरे, निजाम खान पठाण, रजिना बेगम अब्दुल समद, शेख सलीम भीकन तसेच सोयगावच्या गोंदेगाव गणाच्या नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य गयाबाई गोविंदा घोडे व निंबायती गणाच्या सविता सोपान गव्हांडे यांच्यासह सयाजीराव वाघ, राजेंद्र ठोंबरे, दत्ता कुडके, डॉ. विठ्ठल जाधव, बापूराव काकडे, अक्षय मगर, मतीन देशमुख, राहुल सपकाळ, रुपेश जयस्वाल, अरविंद शिंदे, मुक्ताराम पाटील, पंकज जैस्वाल, प्रशांत शिरसागर, गणेश पाटील, शेषराव सोनवणे, तेजराव पवार, अंबादास सपकाळ, हरिदास ताठे आदींची उपस्थिती होती.












