छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो): काँग्रेससह विरोधी पक्षांनी नारीशक्ती वंदन विधेयकाच्या विरोधात मतदान केल्याने प्रस्ताव मंजूर होऊ शकला नाही. त्यामुळे शिवसेनेच्यावतीने रविवारी काँग्रेसच्या निषेधार्थ क्रांतीचौकात आंदोलन करण्यात आले.
केंद्र सरकारने संसदेच्या विशेष अधिवेशनात नारीशक्ती वंदन विधेयक सादर केले होते. लोकसभेच्या जागांची संख्या ५४५ वरून ८५० करणे आणि त्यातील २७३ जागा महिलांसाठी आरक्षित करण्याची तरतूद या विधेयकात होती.
मात्र, लोकसभेत हे विधेयक मंजूर होऊ शकले नाही. काँग्रेस आणि इतर काही राजकीय पक्षांनी या विधेयकाच्या विरोधात मतदान केले. हा भारतातील सर्व मातृशक्तीचा अपमान असल्याचे सांगत शिवसेनेने रविवारी जोरदार आंदोलन केले.
जोरदार घोषणाबाजी
यावेळी काँग्रेस आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या विरोधात घो षणाबाजी करण्यात आली. आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा उपमहापौर राजेंद्र जंजाळ, उपजिल्हाप्रमुख किशोर आवारे, नगरसेविका श्वेता तिवारी,
यशोदा शेळके, शहर प्रमुख विश्वनाथ राजपूत, अंधारे, प्रवीण चौधरी, रामेश्वर शेळके, दीपक पवार, राजेश जंगले, रामेश्वर काळे, मदन नवपुते, आदित्य दहिवाल, शुभम काळे, रामेश्वर मानकापे, श्रीकांत घुले, हिम्मत पटेल, विजय वाघमारे, संदीप काळे, गणेश दायमा, युवासेनेचे सूरज शिंदे, वैभव भगत, अक्षय दाभाडे, महिला आघाडी जिल्हा समन्वयक तेजस्विनी केंद्रे, सुषमा यादगिरे, गायत्री पटेल, सुनीता दायमा यांच्यासह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.













