उज्ज्वला साळुंके
छत्रपती संभाजीनगर: शहराच्या मध्यभागी गेली तब्बल २५ वर्षे इतिहासाची अमूल्य परंपरा जपणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय आजही शिवप्रेमींसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणी, शिवकालीन शस्त्रसामग्री आणि दुर्मिळ वस्तूंचा ठेवा जतन करणारे हे संग्रहालय डिसेंबर १९९९ मध्ये सर्वांसाठी खुले करण्यात आले. महानगरपालिकेने उभारलेली ही भव्य इमारत आज ऐतिहासिक वारशाचे जतन करणारे केंद्र म्हणून ओळखली जात असल्याची माहिती संचालक श्रीप्रकाश पुरवार यांनी दैनिक सांजवार्ताशी बोलताना दिली.
शहरात गेल्या २५ वर्षांपासून इतिहासाची अमूल्य परंपरा जपणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज पुराण वस्तू संग्रहालय आजही शिवप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांसाठी प्रेरणास्थान ठरत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जतन करणे ही आमची जबाबदारी आहे. पुढील पिढ्यांना हा इतिहास प्रत्यक्ष वस्तूंच्या माध्यमातून दाखवणे, हेच ध्येय आहे. दरवर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटक, इतिहास अभ्यासक, संग्रहकार भेटी देतात. जवळपास वर्षभरात दीड लाख ते दोन लाख पर्यटक भेटी देतात.












