सिल्लोड, (प्रतिनिधी) : सिल्लोड येथे ग्रामदैवत म्हसोबा महाराज यांचे दर्शन घेऊन सिल्लोड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रचाराचे नारळ फोडले.
सिल्लोड मधील विविध प्रभागात उभे असलेल्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा आयोजित करण्यात आल्या होत्या, त्यावेळी शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मतदारांना आवाहन करत म्हटले आहे की, येणाऱ्या २ डिसेंबरला सिल्लोडच्या जुलमी रजाकाराला तुमच्या मताच्या माध्यमातून मातीत गाडा असे आव्हान यावेळी करण्यात आले.
त्यावेळी पुढे पुन्हा म्हणाले की, अब्दुल सत्तार या जुलमी रजाकाराने सिल्लोड शहरातीलच नव्हे तर सिल्लोड सोयगांव विधानसभा मतदारसंघातील गोरगरीब लोकांच्या, शेतकऱ्यांच्या जमिनी हडप केलेल्या आहे. मोठा अत्याचार हा या नागरिकांवर करत असून या मतदारसंघातला व शहरात नागरिक भयभीत झालेला आहे. परंतू जर त्याला या निवडणुकीत संपवले नाही, मातीत गाडले नाही. तर उद्या तुम्हाला हा मातीत गाडेल अशा प्रकारचे सुद्धा आवाहन मतदारांना करून निवडणुकीच्या माध्यमातून तुम्ही त्याला मतपेटीच्या रूपाने मातीत गाडा असे आवाहन सिल्लोडच्या मतदारांना केलेले आहे.
पुढे ते म्हणाले की, सेना व भाजपाचे रावसाहेब दानवे हे एकाच नाण्याच्या दोन बाजू असून फक्त मतदारांना ते दाखवण्यासाठी करतात की, तू मारल्यासारखे कर मी रडल्यासारखे करतो हे एकच आहे
त्यांच्या कोणत्याही भूलथापाला तुम्ही बळी पडू नका येणाऱ्या २ डिसेंबरला आपल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांना प्रचंड मते देऊन विजयी करा असे आवाहन केले. या नगर परिषदेच्या निवडणुकीत नगर अध्यक्षपदाचे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून बनेखा पठाण हे उभे असून यांना अध्यक्षपदासाठी आपला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पाठिंबा असून त्यांना सुद्धा आपण मते देऊन विजयी करा असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख शिवसेना उपनेते सुभाष पाटील, शिवसेना नेते पद्माकर इंगळे, उपजिल्हाप्रमुख विठ्ठल बदर, महाविकास आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार बनेखॉ पठाण यांचेही प्रमुख भाषणे झाली. त्यावेळी उपस्थिती पक्ष निरीक्षक राजू इंगळे, माजी महापौर सुदाम सोनवणे, अविनाश कुमावत, नागेश खाडे, संपर्क संघटक सुनिता अऊलवारसह संपर्क संघटक सुनिता देव, अनिता मंत्री, जिल्हा संघटक आशा दातार, उपशहर संघटक प्रतिभा राजपूत, सिल्लोड विधानसभा संघटक रघुनाथ चव्हाण, युवासेना जिल्हा समन्वयक लखन ठाकूर, सिल्लोड तालुकाप्रमुख रघुनाथ घरमोडे, शहर प्रमुख मच्छिंद्र घाडगे, पत्रकार प्रकाश वराडे, तालुका प्रसिद्ध प्रमुख दशरथ सुरडकर संजय काळात्रे, रामेश्वर काळे, अॅड वैभव तायडे, संजय धनवई, सोयगांव तालुका प्रमुख दिलीप मचे, नारायण कानकाटे, उमेदवार मच्छिंद्र धाडगे, गीता घाडगे, किशोर लोखंडे, अमन तायडे, सोहेल मिर्झा, अंजुम मिर्झा, दिलीप वर्षे, महादू गुंजाळ, यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी व यासह महाविकास आघाडीतील उमेदवार कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामदैवत म्हसोबा महाराज चरणी उमेदवार निवडून येण्याचे साकडे ग्रामदैवत म्हसोबा महाराज विचार चरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व उमेदवार निवडून येऊ दे असे शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी साकडे घातले आहे.











