मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनः निरीक्षण बाबत शिवसेनेची आढावा बैठक

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी): निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनः निरीक्षण कार्यक्रममॅपिंग संदर्भात शहरातील आमदार अब्दुल सत्तार यांचे जनसंपर्क कार्यालय शिवसेना भवन येथे खासदार संदीपान भुमरे तसेच आमदार अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली.

या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र राठोड, जि. प. तील शिवसेना गटनेता राधाकीसन पठाडे, माजी सभापती चंद्रकांत जाधव, नगराध्यक्ष अब्दुल समीर अ. सत्तार, उपजिल्हाप्रमुख प्रभाकर काळे, तालुकाप्रमुख केशवराव तायडे, धरमसिंग चव्हाण, देविदास लोखंडे, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल, शिवसेना महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख दुर्गाबाई पवार, सभापती विश्वास दाभाडे, उपसभापती संदीप राऊत, उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ, युवासेनेचे कुणाल राजपूत, शिवा टोम्पे, नंदकिशोर सहारे,
देविदास पालोदकर, सुधाकर पाटील, शकुंतलाबाई बन्सोड, राजश्री निकम, सय्यद नासेर हुसेन, मधुकर गवळी, शंकरराव खांडवे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना खा. संदीपान भुमरे यांनी सांगितले की, मतदार यादी अचूक, पारदर्शक व त्रुटीमुक्त ठेवणे ही लोकशाही बळकटीसाठी अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. विशेष सखोल पुनःनिरीक्षण मोहिमेच्या माध्यमातून मतदार यादीतील दुबार नावे, नवीन मतदारांची नोंदणी, येथे राहत नसलेल्या मतदारांची नावे तसेच बोगस नावे यांची पडताळणी करून यादी शुद्ध करण्याचे काम सुरू आहे.

 शिवसैनिकांना आवाहन केले की, ग्रामीण भागात सर्कल निहाय नियोजन करा. आपल्या आपल्या भागात जाऊन नागरिकांना या मोहिमेबाबत जागरूक करावे. बूथ लेव्हल ऑफिसर यांना सहकार्य करत मतदार यादीतील दुबार नावे व बोगस नावे कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नवीन मतदारांची नोंदणी करून घेणे, नावातील दुरुस्ती करणे
आणि जे मतदार संबंधित भागात राहत नाहीत त्यांच्या नावांची योग्य नोंद करून त्याबाबत प्रशासनाला माहिती देणे, अशी जबाबदारीही त्यांनी अधोरेखित केली.

आमदार अब्दुल सत्तार यांनीही शिवसैनिकांना उद्देशून सांगितले की, प्रत्येक बूथ स्तरावर संघटन मजबूत करत मतदार यादी शुद्धीकरणाचे काम प्रभावीपणे राबवावे. पक्षाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचून प्रत्येक पात्र नागरिकाचा समावेश होईल आणि अपात्र नावे वगळली जातील, यासाठी प्रयत्न करावेत, असे त्यांनी नमूद केले. 

या बैठकीत मॅपिंगच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. आगामी काळात ही मोहीम अधिक गतिमान करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी समन्वयाने काम करण्याचे ठरविण्यात आले. लोकशाही प्रक्रियेला बळकटी देण्यासाठी अचूक व शुद्ध मतदार यादी अत्यावश्यक असून, यासाठी शिवसैनिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन शेवटी खासदार संदीपान भुमरे यांनी केले.