शिवाजी शुगरचा गळीत हंगामाचा गव्हाणीत मोळी टाकून शुभारंभ

Foto
पैठण, (प्रतिनिधी) : शिवाजी अँग्रो इंडस्ट्रीज गुळ कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाचा शुभारंभ जालन्याचे खासदार डॉ. कल्याण काळे यांच्या हस्ते गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून करण्यात आला.

यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण डोणगावकर, काँग्रेस पक्षाचे गटनेते भाऊसाहेब जगताप, अशोकराव डोळस, रामचंद्र काळे, यंशवत काळे, भाऊसाहेब औटे, हरी पंडित गोसावी, राजेंद्र धडपळे, अरुण नरवडे, एजाज पठाण, गणपत मस्के, संतोष राऊत, पाशा धांडे, दशरथ सोनवणे, शाम लोहिया, सोमनाथ जाधव, यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना खासदार काळे म्हणाले की, सध्या सरकारचे शेती विषयक धोरण योग्य नसल्याने शेतकरी व शेती उद्योग अडचणीत आले आहे. केंद्र व राज्य सरकारने शेती विषयक धोरणात बदल करून योग्य शेती उधोग धोरण राबवले पाहिजे. शिवाजी अँग्रो इंडस्ट्रीज गुळ कारखान्याचा हा तिसरा गळीत हंगाम सुरु झाला आहे.

यंदाच्या गळीत हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मागील वर्षी शिवाजी शुगरने २७ शे रुपये भाव दिला होता. यावर्षी जास्तीत जास्त भाव देण्याचा प्रयत्न करु असे आश्वासन यावेळी शिवाजी शुगरचे अध्यक्ष रवींद्र काळे यांनी दिले. यावेळी कमलाकर एडके, ज्ञानेश्वर उगले, दत्ता फासाटे, राजू टेकाळे, प्रकाश निवारे, अनिल काशिद विठ्ठल तळपे, पोपटराव शिंदे, राजू निवारे, निजामभाइ आतार, माऊली सातपुते, किशोर वैद्य, दादासाहेब म्हस्के, आप्पासाहेब मिसाळ, योगेश सुरासे, संजय जाधव, अब्बास पठाण, यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, ऊस तोड कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.