पैठण, (प्रतिनिधी); शिवाजी नागरी सहकारी बँकेची ३७ वी वर्षीक सर्वसाधारण सभा मंगळवारी पैठण येथील आशीर्वाद मंगल कार्यालय येथे बँकेचे चेअरमन रवींद्र शिवाजीराव काळे यांच्या अध्यक्षते खाली पार पडली.
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्व. मा.आ. शिवाजीराव काळे यांच्या प्रतिमेस संचालक मंडळ यांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरवात करण्यात आली. उपस्थित सर्व सभासदांचा सत्कार संचालक मंडळ यांच्या वतीने तर संचालक मंडळ यांचा सत्कार कर्मचारी यांच्या वतीने करण्यात आला. यावेळी पैठण तालुक्याचे भूमिपुत्र विश्वास झारगड हे यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा सत्कार संचालक मंडळ व सभासद यांच्या वतीने करण्यात आला.
तसेच औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल बँकेचे चेअरमन खींद्र शिवाजीराव काळे यांचा भव्य सत्कार सभासद यांच्या वतीने करण्यात आला. या सभेत मागील वर्षीचे इतिवृतांत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण यांनी वाचन केले.
आर्थिक वर्ष २०२६ च्या अहवाल्यावर्ती चेअरमन रवींद्र काळे यांनी बोलताना सांगितले की, बँकेचे एकूण भाग भांडवल सात कोटी अठ्ठावीस लाख झाले असून, बँकेच्या एकूण ठेवी २१९ कोटी झालेल्या असून, कर्ज वाटप १३२ कोटी झालेले आहे. बँकेने आर्थिक वर्षात एक कोटी पंच्याहत्तर लाख नफा मिळवला असून, नेट एन पी ए चे प्रमाण तीन टक्याच्या आत आहे.
सलग वीस वर्षांपासून अ वर्ग मिळवण्याचे सातत्य बँकेने कायम राखले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दहा टक्के प्रमाणे लाभांश सभासद यांना जाहीर केला आहे. भारतीय रिझर्व बँकेच्या नविन निकषा प्रमाणे ए सी बिए ची बँकेने पूर्तता पूर्ण केलेली असल्यामुळे बँकेला नविन शाखा यूपीएल परवाना तसेच कार्य क्षेत्र विस्तार करणे आता सहज शक्य होईल.
यावेळी सभेस मंगल शिवाजीराव काळे बँकेचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब औटे, रामचंद्र काळे, पाशा धांडे, अशोक जाधव, अरुण नरवडे, शाम लोहिया, राजेंद्र टेकाळे, पृथ्वीराज चौहान, दशरथ सोनवणे, कारभारी लोहकरे, तनुजा जाधव, राजेंद्र धरपळे, गणेश शिलवंत, दत्तात्रय फटांगडे, अॅड किशोर वैद्य. यांच्यासह सतिष बलदवा, दादाराव हिवाळे, हेमलता रवींद्र काळे, वैशाली रामचंद्र काळे, मित्र वर्धन काळे, पुष्कर काळे, डॉ. भारत झारगड, अंबादास ढवळे, शंकर सपकाळ, फाजल टेकडी, विष्णू बोडखे, रमेश खांडेकर, योगेश सोलाटे, उत्तम जाधव, सुरेश शेळके, संभाजी गव्हाणे, व्यंकट मुंडे, शंकर गायकवाड, किसन धरपळे, मिठू कारके, निजाम आतार, संदीप काळे, बबलू औटे, बबन तुपे, यशवंत काळे, आसमान काळे, शिवाजी मगरे, मच्छिंद्र मिसाळ, रामचंद्र कर्डिले, बाळासाहेब खुळे, विठ्ठल तळपे, मनुभाई शेख, प्रकाश निवारे, अब्बास पठाण, कारभारी सोनवणे, प्रल्हाद सोनवणे, आप्पासाहेब साळुंखे, हरिभाऊ पोकळे, नरहरी जाधव आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ई आय पठाण व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जीं. व्ही. म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष राऊत यांनी केले व आभार प्रदर्शन रामचंद्र काळे यांनी मानले.















