सिल्लोड पंचायत समितीमध्ये शिवराज्याभिषेक दिन उत्साहात

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवराज्य अभिषेक दिन शनिवारी पंचायत समिती कार्यालय सिल्लोड येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन करण्यात आले त्यानंतर स्वराज्याची गुढी उभारून गुढीचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामूहिक राष्ट्रगीत व राज्य गीत गायन करण्यात आले.

यानंतर आरोग्य विभागामार्फत तंबाखू मुक्त बाबत शपथ घेण्यात आली तसेच सहाय्यक गटविकास पंचायत समिती अधिकारी सिल्लोड आशिष मस्के यांनी स्वराज्य दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या नंतर वंदे मातरम गीत गायन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

उपसभापती पंचायत समिती सिल्लोड भगवान आहेर, सुरेश बनकर, पंचायत समिती सदस्य वृषाली मिरकर, सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती सिल्लोड आशिष म्हस्के, तालुका पशुधन व दुग्ध व्यवसाय अधिकारी विजय चव्हाण, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नासेर खान, उप विभागीय अभियंता पाणीपुरवठा आप्पासाहेब काटकर, उप अभियंता बांधकाम राजेश राजगुरू, बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनीता सानान्से, गटशिक्षणाधिकारी
राजेश महाजन, सहाय्यक प्रशासनाधिकारी राजेंद्र निकम, कनिष्ठ प्रशासन अधिकारी दिपक गावंदे, विस्ताराधिकारी शिक्षण रमेश राजगुरू, राजू फुसे, विस्तार अधिकारी सांख्यिकी केवलसिंग पाटील, विस्तार अधिकारी आरोग्य समाधान जाधव तसेच कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.