पैठण, (प्रतिनिधी): श्री संत एकनाथ सहकारी साखर कारखाना संचलित सचिन घायाळ शुगर लि. कडे थकित ऊस बिलाची रक्कम वसुलीसाठी सुरू असलेली जप्तीची कारवाई व लिलाव प्रक्रिया तात्काळ पूर्ण करवे.
शेतकऱ्यांचे थकीत न उसाचे बिल तात्काळ देण्यात यावे. तसेच इतर विविध मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने ज्ञानेश्वर माऊली मुळे व सामाजिक कार्यकर्ते पवन सिसोदे यांच्या नेतृत्वाखाली तहसील कार्यालय परिसरात असलेल्या पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन सुरू करण्यात आले. यामुळे तहसील प्रशासनाची व पोलीस प्रशासनाची त्रेधा तिरपीट उडाली आहे.













