गृहभेट व ऑनलाईन माहिती न भरल्याप्रकरणी कारवाई
वैजापूर, (प्रतिनिधी): भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरिक्षण (एसआयआर) मोहिमेत हलगर्जीपणा करणाऱ्या ७८ बूथ लेव्हल अधिकाऱ्यांना (बीएलओ) निवडणूक प्रशासनाने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. उपविभागीय अधिकारी कार्यालयाने केलेल्या या कारवाईमुळे निवडणूक यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
वेळ बद्ध व राष्ट्रीय महत्त्वाच्या या मोहिमेतील कामात कोणतीही कुचराई सहन केली जाणार नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. व मतदारांची ऑनलाईन माहिती विशेष सखोल पुनरिक्षण मोहिमेअंतर्गत ३० जूनपासून गृहभेट भरण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मात्र, हे काम वेळेत सुरू न करणाऱ्या तसेच मतदारांकडून प्राप्त झालेल्या गणना फॉर्मचे ऑनलाईन डिजिटायझेशन न करणाऱ्या बीएलओंना नोटीस बजावण्यात आली आहे. प्रशासनाने या प्रकाराला गंभीर स्वरूपाची हलगर्जी मानले असून, संबंधित बीएलओंकडून तातडीने खुलासा मागविला आहे.
समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास किंवा निश्चित मुदतीत कामात सुधारणा न केल्यास लोकप्रतिनिधित्व अधिनियम तसेच शासकीय सेवा नियमांनुसार शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा नोटिसीत देण्यात आला आहे.
एसआयआर मोहिमेच्या कामकाजावर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात असून, यापुढेही कामात निष्काळजीपणा करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. एस. जी. गुथे, संतोष पवार, के. एस. पाटील, विलास गितवणे, जे. जी. तुपे, खींद्र जगताप, एस. आर. जाधव, व्ही. व्ही. वाघचौरे, एस. डी. प्रधान, विशाल फालके, जनार्दन सूर्यवंशी, नीलेश पानपाटील, शंकर खंडागळे, राजेंद्र रावते, अशोक पाडुळ, मच्छिंद्र पठारे, शिवाजी पिवळ, एन. एस. ननवरे, श्रीधर कदम, व्ही. आर. शेळके, एम.एम. तारोडे, रवींद्र फालटणकर, बापू अहिरे, भगवान कदम, विश्वनाथ उगले, भागवत गुथे, तुषार कुलकर्णी, एस. व्ही. लाड, सखाहरी नवले, बाबासाहेब जाधव, एस. एस. निकम, बाबासाहेब मोरे, शर्मिला पठारे, संतोष दुधमाळ, सोनाली कुटे, रामनाथ बोबडे, देवदत्त बोबडे, राजेश म्हाळसकर, विजय मालडोदे, रामदास काळे, तुळशीराम धनेधर, सारिका बोंडगे, सचिन दराडे, नीलेश खराडे, दीपक पराडकर, नामदेव धनेधर, प्रदीप जाधव, अमोल गायके, इस्लाम शेख, कल्पना भालके, अमित जेजूरकर, श्रीराम सोनवणे, गणेश आपरे, एस. व्ही. शेटे, पद्माकर कुचेकर, संजय राठोड, मुकुंद पाटणकर, बाबासाहेब जाधव, पी. बी. वाघमारे, व्ही. डी. तांबे, भाऊसाहेब थोरात, जी. व्ही. पाटील, शोभा हरदे, बाबासाहेब जाधव, जागृती खैरनार, ए. एच. आठरे, वर्षा माने, वाल्मीक कुर्णे, रोहिदास साळुंके, राजाराम कपाडी, राजू रुसणके, प्रियंका दळवी, ईश्वर साबळे, विजया लांडे, सूर्यकांत पळवे, पांडुरंग खेडकर, संदीप वैद्य व विश्वनाथ उगले यांना नोटीस बजावण्यात आली आहे.














