औरंगाबाद: प्रचंड उकाड्याने हैराण असलेललया शहरवासीयांना आज सकाळी पावसाच्या सरींनी सुखद धक्का दिला. आज सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे आज सकाळपासूनच पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. अपेक्षेप्रमाणे सकाळी ९:३० च्या सुमारास पावसाच्या हलक्या सरींना सुरुवात झाली. यामुळे शहरातील जालना रोड यामुळे पूर्णपणे ओला झाला होता. थोडा का होईना पण पाऊस पडल्याने उकाड्याने त्रस्त असलेल्या शहरवासीयांना थोडा दिलासा मिळाला आहे. आता मान्सूनच्या जोरदार आगमनाची प्रतीक्षा सर्वानाच लागली आहे.