छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्युरो) : इस्कॉन वी.ई. सी.सी.च्या निर्माणाधीन मंदिर प्रांगणात सुरू असलेल्या सात दिवसीय मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम कथाच्या पाचव्या दिवशी कथा पंडाल श्रद्धा, भक्ती आणि मर्यादेच्या अद्भुत संगमाने भारावून गेला. जगप्रसिद्ध प्रवक्ता लाल गोविंद दास प्रभू यांनी बालकांडातील जनकपुरी, पुष्पवाटिका आणि सीता स्वयंवर या प्रसंगांचे चित्रण केले.
कथेची सुरुवात करताना लाल गोविंद प्रभूनी सांगितले की, विष्णुस्वरूप भगवान श्रीराम जगतपिता असूनही नेहमी मर्यादेचे पालन करत होते. म्हणूनच त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हटले जाते. जनकपुरीतील सुंदर प्रसंग सांगताना त्यांनी नमूद केले की, एका संध्याकाळी श्रीरामांना ब्राह्मणांच्या निमंत्रणावरून जनकपुरी फिरण्याची इच्छा झाली. यावेळी कथेला इस्कॉन अन्नामृत फाउंडेशन, मुंबईचे प्रमुख
पुष्पवाटिका प्रसंगातून परोपकाराचा संदेश
जनकपुरीतील पुष्पवाटिकेचे वर्णन करताना लाल गोविंद प्रभूनी श्रीराम-लक्ष्मण संवादाचे भावपूर्ण चित्र उभे केले. ते म्हणाले, वृक्ष आपल्याला फळे, फुले वृक्ष आपल्याला फळे, फुले आणि सावली देतात. ते शिकवतात की, जीवनाचा खरा अर्थ स्वार्थापेक्षा परोपकारात आहे. जो मनुष्य परोपकाराला जीवनाचे व्रत बनवतो, त्याचे नाव बिनवतो, त्याचे नाव इतिहासात अमर होते.
डॉ. राधाकृष्ण प्रभू, पालिका माता, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ. पुरुषोत्तम अग्रवाल, गोपाल अग्रवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. श्रीराम कथा सेवा समितीचे अध्यक्ष एन.के. गुप्ता यांच्या नेतृत्वाखाली
राजकुमार अग्रवाल, राजेश भारुका, डॉ. विशाल लदनिया, जगदीश अग्रवाल, गोविंद अग्रवाल, रुक्मिणी रमण प्रभू, विजय गोयल आणि सर्व कार्यकारिणी सदस्य सेवेत कार्यरत आहेत.















