श्री स्वामी समर्थ महाराज कि जय... जयघोषाने दुमदूमले

Foto
बाबरा श्री स्वामी समर्थ महाराजांचा ११२ वा पालखी सोहळा भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात

 फुलंब्री, (प्रतिनिधी) : फुलंब्री तालुक्यातील बाबरा येथे (दी.३१) रविवार रोजी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा पाळखी सोहळा मोठ्या थाटात संपन्न झाला. पालखी सोहळ्याला गावातील बालाजी मंदिर येथून सुरुवात झाली गावातील महिलांनी पालखी मार्गांवर सडा रांगोळी काढल्या. 

सोहळ्या मध्ये गावाकऱ्यांनी पाऊल्या खेळत आनंद द्विगुणित केला या सोहळ्याची समाप्ती गाव प्रदक्षणा करून बालाजी मंदिर येथे करण्यात आली. बाबरा गावात उत्साहात पालखी सोहळा झाला. बन्सीलालनगर सेवा केंद्राचे केंद्र प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले यावेळी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जितेंद्र जैस्वाल, अजिंक्य काथार, संतोष तांबट, विकास तुपे, रमेश झालानी, रमेश काथार, नवनाथ बोलकर, योगेश तांबट, अंकुश मालकर, आदित्य तांबट, तेजस तांबट, वेदांत काथार, शुभम गोसावी, यांच्यासह अन्य सेवेकरी उपस्थित होते. 

पालखी सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी बाबरा येथील सेवेकऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी बाबरा गावकरी व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.