सिल्लोड पंचायत समिती भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात

Foto
सभापतीपदी अनिता बनकर, उपसभापतीपदी भगवान आहेर

सिल्लोड, (प्रतिनिधी) : तालुक्यातील पंचायत समितीच्या सभापती पदी भाजपाच्या अनिता सुरेश बनकर व उपसभापतीपदी भगवान आहेर यांची निवड झाली. मंत्री मंत्री अब्दुल सत्तार यांच्या
मतदार संघातील दोन्हीही पंचायत समिती भाजपने एक हाती सत्ता मिळवली यामुळे आमदार अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का मानला जात आहे.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे, जिल्हाध्यक्ष सुहास शिरसाट यांनी फोनद्वारे अभिनंदन केले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पंचायत समितीचे सदस्य वृषाली मिरकर अनुराधा गवळे, गजानन जाधव, नेहा खरात, तेजस्विनी जगताप, नारायण खोमणे, सुमित्रा बनसोड, तुळसा कोठाळे यांनी एकमताने हात उंचावून भारतीय जनता पार्टीच्या सभापती उपसभापती पदाच्या उमेदवारांना पाठिंबा दिला. 

यावेळी भाजपा अल्पसंख्यांक प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी, माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर पाटील मोठे, भाजप किसान मोर्चा सरचिटणीस मकरंद कोरडे भाजप जिल्हा उपाध्यक्ष सुनील मिरकर, जिल्हा परिषद सदस्य सचिन वाघ, राधाकृष्ण काकडे, माजी सभापती अशोक गरुड, माजी उपसभापती अरुण काळे, कैलास जंजाळ, दिलीप दाणेकर, ज्ञानेश्वर तायडे, भाजपा जिल्हा सचिव कमलेश कटारिया, सुभाष मानकर, अनिल खरात, गजानन राऊत, मंडळ अध्यक्ष मनोज मोरेल्लू एकनाथ हिवाळे, आत्माराम पाडळे, विजय वानखेडे, गणेश भूमकर, स्वप्निल शिनगारे, नारायण बडक, किशोर गवळे, रघुनाथ पांडव, योगेश खोमणे, भाऊसाहेब उबाळे, अमोल शेळके, साहेबराव बांबर्डे यांच्यासह हजारो कार्यकत्यांनी भाजपा कार्यालय सिल्लोड येथे येऊन निवडीचे अभिनंदन केले.