सिल्लोड, (प्रतिनिधी) : नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. दुपारी ३:३० पर्यंत ६२.४३ टक्के मतदान झाल्यानंतर अखेर सरासरी ७०.५१ टक्के मतदानाची नोंद झाली. शहरातील ६१ केंद्रापैकी ८ केंद्रांवर बॅलेट युनिट बंद पडल्याने काही ठिकाणी मतदानाची गती मंदावली; मात्र युनिट बदलून प्रक्रिया तात्काळ सुरळीत करण्यात आली होती.
प्रभाग ८ मधील केंद्र क्रमांक १ व ५. प्रभाग २ मधील रामकृष्ण विद्यालय, प्रभाग ६ मधील नेशनल उर्दू शाळा-जमालशा कॉलनी, श्रीकृष्णनगर व छत्तीस एकर परिसरात मॉकपोलनंतर युनिट बंद पडल्याची नोंद झाली. निवडणूक निर्णय अधिकारी नीलेश अपार यांच्या सूचनेनुसार सहाय्यक निवडणूक अधिकारी कारभारी दिवेकर यांनी काही मिनिटांत मशीन बदलली,
दरम्यान, प्रभाग ८, ४, ६ आणि १३ मध्ये बोगस मतदानाच्या कारणावरून भाजप, शिंदे सेना, उद्धवसेना आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) कार्यकत्याँत किरकोळ वाद झाले. डीवायएसपी डॉ. दिनेश कोल्हे व शहर पोलिस निरीक्षक शेषराव उदार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी परिस्थिती तात्काळ नियंत्रणात आणली. १२ संवेदनशील केंद्रांसह सर्व ठिकाणी पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला. दिवसभर उमेदवार व पक्षनेते केंद्रांवर फिरत मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करताना सरासरी ७०.५१ टक्के मतदान, पोलिसांचा बंदोबस्त दिसले.
शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार, माजी नगराध्यक्ष अब्दुल समीर, विश्वासराव दाभाडे, अर्जुन पा. गाडे, केशवराव तायडे आदींची उपस्थिती लक्षणीय होती. भाजपचे सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीत सकाळपासून मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. टोकन देऊन मतदान शेवटच्या क्षणी मतदारांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अनेक केंद्रांवर रांगेतील मतदारांना टोकन देऊन मतदानाची संधी देण्यात आली.
जोगेश्वरी मूकबधिर व अपंग विद्यालयात मतदान सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत सुरू होते.
माजी आमदार सांडू पाटील लोखंडे, इद्रिस मुलतानी, सुरेश बनकर, अशोक गरुड यांनी प्रचारक छावण्यांना भेटी दिल्या. अब्दुल सत्तार व अब्दुल समीर यांनी अब्दालशहा नगरात, बनेखा पठाण यांनी टिळकनगरात तर भाजपाचे उमेदवार मनोज आ. सत्तार मुलतानीमध्ये बाचाबाची प्रभाग क्रमांक तेरामधील भाजपच्या य एजंटला शिवसेनेचे उमेदवार व कार्यकत्यांनी मारहाण केल्याने तणाव निर्माण झाला होता,
मात्र पोलिसांनी तत्काळ धाव घेत वाद मिटवल्याने तणाव निवळला, तर मतदान केंद्रांच्या भेटीदरम्यान प्रभाग क्रमांक आठमघोल केंद्रावर आ. अब्दुल सत्तार व भाजप अल्पसंख्याक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस मुलतानी यांच्यातही बाचाबाची झाल्याचे कळते. असे किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत झाले, मोरेलू यांनी समतानगर व शिवाजीनगर येथे मतदान केले. निवडणूक निर्णय अधिकारी निलेश अपार, सहाय्यक निवडणूक अधिकारी संजय देवराय व कारभारी दिवेकर यांनी दिवसभर काटेकोर देखरेख ठेवत मतदान प्रक्रिया शांततेत पूर्ण केली.















