सिल्लोडला अवैध खतांचा साठा जप्त

Foto
कृषी विभागाची कारवाई: ग्रामीण ठाण्यात गुन्हा नोंद

सिल्लोड, (प्रतिनिधी) अवैधरीत्या विविध प्रकारच्या र खतांचा साठा करून त्याची न नियमबाह्य विक्री गोरख धंदा - करणाऱ्या गोडाऊनवर उद्योग . कृषी विभागाच्या पथकाने छापा टाकला. यात अवैधरीत्या साठवून ठेवलेला १९ लाखांचा खताचा साठा जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.६) संध्याकाळच्या सुमारास केली.

याप्रकरणी सिल्लोड तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील गुण नियंत्रण अधिकारी प्रमोद डापके यांनी सिल्लोड ग्रामीण पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे, की सिल्लोड ते कन्नड रस्त्यावरील मोढा खुर्द परिसरातील एका गोडाऊनमध्ये अवैधरीत्या खतांची पॅकिंग करण्यात येत असल्याचा व्हिडिओ त्यांना प्राप्त झाला. त्याची शहानिशा करण्यासाठी त्यांच्यासह तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, ग्रामीण पोलिस ठाण्याचे सपोनि रवींद्र ठाकरे, कर्मचारी दीपक इंगळे, रमेश व्यवहारे यांच्या पथकाने मोढा खुर्द येथे छापा टाकला. त्यावेळी त्यांना गोडाऊनमध्ये लीप फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स कंपनीच्या विविध खतांच्या १ हजार ९७३ गोण्या (अंदाजे किंमत १९ लाख ५ हजार ६४० रुपये) आढळून आल्या. 

लीप फर्टिलायझर्स अॅण्ड केमिकल्स कंपनीच्या नावे विनापरवाना बेकायदेशीर खताची निर्मिती व साठवणूक करून, विनापरवाना खताचे उत्पादन व नियमबाह्य विक्री करण्यासाठी जमा केलेला साठा कारवाईत सील करण्यात आली.
जिल्हास्तरीय भरारी पथकाचे पथकप्रमुख कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक हरीभाऊ कातोरे, तालुका कृषी अधिकारी संदीप जगताप, गुणनियंत्रण अधिकारी प्रमोद पाटील, मनोजकुमार सैंदाणे, एस. डी. हिवराळे, गोविंद पौळ यांच्या पथकाने केली. खताचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.