सिल्लोड नगर परिषदेची स्थायी, विषय समिती निवडणूक बिनविरोध

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) सिल्लोड नगर परिषदेची स्थायी, विषय समिती निवडणूक बिनविरोध पार पडली. नगर परिषदेच्या सभागृहात पीठासीन अधिकारी तथा मुख्याधिकारी कारभारी दिवेकर यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी, विषय समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांची घोषणा करण्यात आली. ही निवडणूक बिनविरोध पार पडल्याने सर्व सदस्यांची निवड एकमताने झाली आहे.
 :
नगराध्यक्ष अब्दुल समीर हे पदसिद्ध सभापती आहेत. त्यासोबतच उपनगराध्यक्ष विठ्ठल सपकाळ हे पदसिद्ध शिक्षण सभापती तसेच सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी मनीषा जितेंद्र आरके, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती पदी अकिल वसईकर, पाणीपुरवठा सभापती पदी शेख इम्रान (गुड्डू) महिला व बालकल्याण समितीच्या सभापती पदी वैशाली नरेंद्र पाटील
उपसभापतीपदी सुमन अशोक बन्सोड तर नियोजन व विकास समितीच्या सभापतीपदी शेख बाबू यांची निवड झाली. सिद्धेश्वर आहेर, शेख रउफ बागवान, शेख महंमद कय्युम हे स्थायी समितीचे सदस्य असणार आहे.

स्थायी, विषय समिती ही नगर परिषदेतील अत्यंत महत्त्वाची समिती असून शहराच्या प्रशासनाचा कणा मानली जाते. नगर परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक, विकासकामांचे प्रस्ताव, कर वसुली, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, विद्युत व्यवस्था, आरोग्य व इतर नागरी सुविधांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्याचे अधिकार या समितीकडे असतात. स्थायी, विषय समितीचे नवनिर्वाचित सभापती, उपसभापती व सदस्यांचा नगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.