सिल्लोड तालुक्याची यंदाही उत्कृष्ट यशाची परंपरा कायम

Foto
सिल्लोड, (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता १० वी मार्च २०२६ परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सिल्लोड तालुक्याने यंदाही उत्कृष्ट यशाची परंपरा कायम राखत ९४.६५ टक्के इतका उल्लेखनीय निकाल नोंदविला आहे. 

या परीक्षेसाठी तालुक्यातून एकूण ६९१८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६८८४ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेस बसले होते. यामध्ये ३७३६ मुले व ३१४८ मुलींचा समावेश होता. परीक्षेत एकूण ६५१६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून त्यामध्ये ३४३९ मुले व ३०७७मुलींचा समावेश आहे.

निकालाच्या टक्केवारीत मुलींनी पुन्हा एकदा आघाडी घेतली असून मुलांचा निकाल ९२.०५ टक्के तर मुलींचा निकाल तब्बल ९७.७४ टक्के इतका लागला आहे. दरम्यान, सिल्लोड शहरातील विद्यार्थ्यांसाठी यांच्या मार्फत मोफत
निकाल पाहून प्रिंट देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना त्वरित व सोयीस्कर सेवा मिळाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनी समाधान व्यक्त केले. 

सिल्लोड तालुक्याने सातत्याने उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवत यंदाही उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या यशामागे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या संयुक्त परिश्रमाचे मोठे योगदान असल्याची भावना शिक्षण क्षेत्रातून व्यक्त होत आहे.