सिल्लोड, (प्रतिनिधी): सिल्लोड तालुक्यात शहरासह १५ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या परिसरातील धरणात पाण्याची आवक सुरू झाली आहे. या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले. २४ तासांत सरासरी ११७ मि.मी पाऊस ११७ मिमी पावसाची नोंद खेळणा धरणात वाढली. खेळण्णा नदीसह नदी-नाले पावसामुळे दुथडी भरून वाहू लागले आहेत. परिणामी खेळणा पावसात ओव्हरफ्लो झाले.
सिल्लोड २४ तासांतील पर्जन्यमान (मिमी)
सिल्लोड
१३२
पराधी
१२०
अजिंठा
१४३
गोळेगाव बु.
११७
आमठाणा
१३०
निल्लोड
१३५
बोरगाव वा.
८५.
तालुक्याची सरासरी ११७ मिमी.
धरणाबरोबरच अजिंठा अंधारी, चारनेर पेंडगाव आणि निल्लोड धरणांमध्येही पाण्याची आवक वाढली आहे. या पावसामुळे खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. विहिरींच्या पाणीपातळीतही वाढ होण्याची शक्यता आहे. केळगाव परिसरात नदीला पूर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. जुलैअखेर तालुक्यात एकूण ३९५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.












