पुलवामा येथे भारतीय केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) जवानांवर झालेल्या भ्याड हल्ल्यात तब्बल ४१ जवानांना बलिदान द्यावे लागले. पाकिस्तान पुरस्कृत लष्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या या भ्याड हल्ल्यानंतर देशभर संतापाची लाट उसळली आहे. कूटनीतिक पातळीवर पाकिस्तानची कोंडी करण्याचा प्रयत्न भारत करत आहे. याबरोबरच पाकिस्तान सोबत विश्वचषक स्पर्धेत खेळला जाणारा सामना देखील रद्द व्हावा अशी मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर ICC ने आपली भूमिका स्पष्ट केली असून विश्वचषक स्पधेर्तील सर्व समाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे होईल असे ICC चे CEO डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले आहे.
नियोजित वेळापत्रकाप्रमाणे १६ जून रोजी भारत पाक दरम्यान साखळी फेरीतील सामना होणार आहे. या सामन्याविषयी निर्माण झालेल्या साशंकतेबद्दल त्यांना विचारले असता ते म्हणाले कि अशी कुठलीही परिस्थिती नाही ज्यामुळे सामना रद्द होईल त्यामुळे भारत पाक सामना नियोजित वेळा पत्रकाप्रमाणेच होईल.
इंग्लंडच्या ओल्ड ट्रॅफोर्ड स्टेडियममध्ये १६ जूनला होणाऱ्या भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यासाठी २५ हजार प्रेक्षकसंख्या असलेले मैदान उपलब्ध आहे. मात्र या सामन्यासाठी तब्बल ४ लाख क्रिकेटप्रेमींचे अर्ज आलेले आहेत, अशी माहितीही ICC ने दिली आहे. ICC World Cup 2019 स्पर्धेचे संचालक स्टीव्ह एलवर्थी म्हणाले की भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना साखळी फेरीतील सामना आहे. त्याप्रमाणेच साखळी फेरीतील इंगलण्ड विरुद्ध ऑस्ट्रेलिया या सामनादेखील पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांचा आहे. पण या सामन्यापेक्षाही भारत-पाक सामन्याच्या तिकिटासाठी सुमारे ४ लाख अर्ज आले आहेत. विश्वचषकासंदर्भात झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली.