औरंगाबाद: शहरात सायंकाळी पावणे पाच वाजेच्या दरम्यान झालेल्या हलक्या सरींमुळे आकाशवाणी परिसरातील वीज गायब झाली होती. त्यामुळे आकाशवाणी चौकातील सिग्नल बंद असल्याने वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पहायला मिळाले. तसेच वाहतुक नियंत्रणात आणताना वाहतुक पोलिसांची तारांबळ उडल्याचे दिसुन आले.
पाऊस आणि महावितरण यांचे जणू हाडवैरच. शहरात थोडाजरी पाऊस कोसळला की लगेच बत्ती गुल होते. याचा प्रत्यय रोजच शहरवासियांनी येत असतो. आज ४:४५ च्या आसपास हलक्या पावसाच्या सरी आल्याबरोबर शहरातील अनेक भागातील विज गायब झाल्याचे पहायला मिळाले. यामुळे शहरातील नागरिक उकड्याने त्रस्त तर झालेच. याबरोबरच आकाशवाणी चौकात उभ्या असलेल्या वाहतुक पोलिसांच्या वाहने अडवू अडवू अक्षरशः नाकी नऊ आले होते.
















