साठाव्या वर्षी गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीचे यशस्वी शतक पूर्ण

Foto
बजरंग काळे यांचा दुर्गप्रेमींकडून सत्कार

पैठण, (प्रतिनिधी): श्रीक्षेत्र वडवाळी येथील शेतकरी, कोठीवाले कुटुंबातील बजरंग रुस्तुम काळे यांनी नुकतेच शंभरावा गगनगड रेंज ट्रेक पूर्ण केला आहे. यानिमित्त दुर्गप्रेमी संस्थेच्या वतीने बजरंग काळे यांचा सर्व जगनाथ राऊत, संतोष बेडके, विवेक पाटील, दीपक भोसले, हरी साळुंके, सोपान बांगर यांच्या हस्ते सत्कार करून अभिनंदन करण्यात आले.

 बजरंग काळे यांनी पैठण दुर्ग प्रतिष्ठान या संस्थेच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या, स्वराज्याचे संरक्षक असणाऱ्या सह्याद्रीच्या कुशीतील तब्बल शंभर गडकिल्ले अभ्यास, भ्रमंती, परिसर स्वच्छता, वृक्षारोपण व संवर्धन केले. या प्रसंगी विविध प्रकारची इतिहास व संस्कृती रक्षक अशी
ध्येयं बाळगणाऱ्या सह्याद्रीचे सोबती, पैठण दुर्ग प्रतिष्ठाण, पर्यटन माझा महाराष्ट्र, दुर्गप्रेमी मंडळ, बा रायगड, हिंदवी परिवार या संस्थांनी केलेल्या सततच्या मार्गर्शनाचा आणि प्रेरणेचा बजरंग काळे यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख
केला. 

इंग्रजी भाषा विषयाचे व्यासंगी शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या बजरंग काळे यांनी सतत दुर्ग भ्रमंती, दुर्ग संवर्धन आणि अभ्यास यामध्ये पैठण आणि छत्रपती संभाजीनगर येथील दुर्गप्रेमींच्या सहकाऱ्यांसह वयाच्या
आपल्या साठाव्या वर्षी वनदुर्ग, जलदुर्ग, गिरीदुर्ग आणि स्थलदुर्ग या सर्व प्रकारातील भ्रमंती मोहिमा पूर्ण केल्या आहेत. दुर्गप्रेमींच्या मानसिक आणि शारीरिक क्षमतेचा कस लागणाऱ्या सह्याद्रीच्या उंचचउंच पर्वतरंगातील हे गडकिल्ले
भ्रमंतीचे शतक पूर्ण करण्याच्या व्यासंगामध्ये आपणांस सुसंस्कृत मुख्याध्यापिका असलेली पत्नी जलकन्या बजरंग काळेने सातत्याने पाठिंबा दिला. प्रोत्साहन दिले. 

या सत्कार प्रसंगी अनिता काळे, कविता काळे, संपदा काळे यांनी बजरंग काळे यांचे औक्षण करून अभिनंदन केले. त्याचप्रमाणे पैठण येथील डॉ. सुनील गायकवाड, प्राचार्य संतोष तांबे, प्रा. संतोष गव्हाणे, प्रा. महेश गोंडे पाटील, आबासाहेब जाधव, योगेश लोहारे, मिलिंद रोडे, संतोष गोबरे, शिवाजी गाडे, बाळू आहेर, विष्णू ससाणे, रामदास रामावत, ज्ञानेश्वर नवले, सुनील पायघन, रविंद्र काळे, प्रकाश सोनवणे, द्वारकादास निवारे, आदींसह अनेक शिवभक्तांनी गडकिल्ल्यांचे शतक पूर्ण केल्याबद्दल बजरंग काळे यांचे अभिनंदन केले आहे.