भावी पती केतनला मारण्याचा सिया गोयलचा खतरनाक प्लॅन यशस्वी झाला खरा पण कारस्थान झाले उघड !!

Foto
पुणे : येथील केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात अनेक महत्त्वाचे आणि खळबळजनक खुलासे होत असून भावी  नवऱ्याचा बॉयफ्रेंडसोबत मिळून काटा काढणाऱ्या सिया गोयल हिचे  अनेक कारनामे उजेडात येत आहेत.. केतन अग्रवाल याला 400 फूट खोल दरीत ढकलून दिल्यानंतर त्याचा पाय घसरून मृत्यू झाल्या बनाव  सियाने रचला होता परंतु केतनच्या बहिणीच्या सजगतेमुळे हा बनाव उघड झाला आणि केतनशी लग्न करण्याची इच्छा नव्हती म्हणून  म्हणून तिने तिचा बॉयफ्रेंड चेतन चौधरी याच्या मदतीने  हे कांड केल्याची कबुली दिली. 

दरम्यान केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्यक्ष हत्येच्या चार दिवस  आधीही सिया गोयलने  केतनला दरीत ढकलून जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याला मारण्यासाठीचा तो प्लान  होता. ते म्हणाले की, सिया आणि केतन यांनी लोहगड किल्ल्याला तीन वेळा भेट दिली होती. 14 जून रोजी, म्हणजेच हत्येच्या चार दिवस आधी, सिया केतनला लोणावळाला लोहगडावर घेऊन गेली. हा तिच्या कटाचा प्लान A होता. याच भेटीदरम्यान सियानं केतनच्या जीवावर पहिला प्रयत्न केला. तिने त्याला किल्ल्यावरून दरीच्या दिशेने  ढकलले  परंतु  केतनने  एका झुडपाला पकडले  आणि त्याचे प्राण वाचले. मात्र आपले  बिंग फुटणार हे लक्षात  येताच सियाने  हुशारीने "साप! साप!" असे ओरडत केतनला जाऊन मिठी मारली. त्यामुळे खरोखरच सापापासून वाचवण्यासाठी सियाने तसे केले असावे असे  केतनला वाटले त्यामुळे या प्रकरणाचा फार इश्यू झाला नाही. 

पुढे बोलताना अग्रवाल म्हणाले कि , 19 जून रोजी सियाचा वाढदिवस होता. याच्या एक दिवस आधीच सियाने  प्री-बर्थडे सरप्राइजच्या निमित्ताने  केतनला लोणावळ्यातील लोहगढ किल्ल्यावर नेले.  पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्यावेळी सिया गोयल आणि केतन अग्रवाल लोहगडावर होते, त्याचवेळी सियाचा बॉयफ्रेंड चेतन चौधरीसुद्धा तिथे उपस्थित होता. चेतनने  त्याचा मोबाईल कोंढवामधल्या आपल्या घरी ठेवलेला, तसेच, त्याच्या मोबाइलचे इंटरनेट सकाळपासून बंद होते . त्यानंतर त्यानं स्वतःची ओळख लपवण्यासाठी हुडी घालून  चेहरा पूर्णपणे लपवला होता. मात्र  भर उन्हात असे कपडे वापरणाऱ्या तरुणाचा पोलिसांना संशय आला आणि तिथेच सिया आणि चेतननं रचलेला मोठा कट फसला. हुडी घालून गडावर जातानाचा चेतनचा सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. 

घटना घडली तेंव्हा लोहगडावर केतन आपल्या मोबाईलनं फोटो काढत असतानाच सियानं त्याला दरीत ढकलले.  त्यानंतर तिनं पोलिसांना फोन करुन सांगितलं की, केतनचा पाय घसरलाय आणि तो खाली पडला. पोलीस आणि कुटुंबीय घटनास्थळी पोहोचले. सर्वांना अपघाती मृत्यू वाटला आणि सिया गोयलचा हा प्लॅन यशस्वी झाला. असे तिला वाटले. पण हा सर्व प्रकार उघडीस आला आणि केतनच्या मृत्यू अपघात नसून खून असल्याचे उघडकीस आले.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फेब्रुवारीमध्ये दोघांचं लग्न ठरलेलं, त्यानंतर साखरपुडाही ठरलेला. पण, त्यानंतर दोघांमध्ये वारंवार खटके उडायचे. त्यानंतर पुणे ग्रामीण पोलिसांनी क्राइम ब्रांच आणि लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तपास करुन प्रकरणाचा छडा लावला. 

नेमकं प्रकरण काय?
पुण्याच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगला गेलेल्या केतन अग्रवालचा पाय घसरून दरीत पडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. सुरुवातीला हा निव्वळ एक अपघात वाटत असतानाच, आता पुणे पोलिसांच्या तपासात एक अत्यंत खळबळजनक आणि थरारक खुलासा झाला आहे. हा अपघात नसून, होणाऱ्या पत्नीनेच आपल्या प्रियकराच्या मदतीने रचलेला हा एक थंड डोक्याने केलेला 'मर्डर प्लॅन' असल्याचं निष्पन्न झाले आहे. . अग्रवाल कुटुंबात लग्नाची तयारी सुरू असताना, प्रेमातील अडसर दूर करण्यासाठी केतनची भावी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी या दोघांनी मिळून केतन अगरवालची लोहगड किल्ल्यावरून दरीत ढकलून हत्या केल्याचं तपासाअंती स्पष्ट झालंय..सियाचा वाढदिवस साजरा करण्यासाठी केतन लोहगडावर गेला होता..यावेळी फोटोसाठी पोज देताना सियाच्या प्रियकराने केतनला दरीत ढकलून दिल्याचे  समोर आले आहे. केतनची हत्या एक अपघात असल्याचा प्लॅन होता असे सिया आणि तिच्या प्रियकराला दाखवायचं होतं. पण एका सीसीटिव्हीत या दोघांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्याने दोघांनी केतनची हत्या केल्याचे उघडकीस आले.