गंगापूर तालुक्यातील वरझडीमध्ये ५०० झाडांची कत्तल उघडकीस

Foto
गंगापूर (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील मौजे वरझडी येथे झाडे लावा, झाडे जगवा या  शासनाच्या मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. मौजे वरझडीमध्ये सार्वजनिक बांधकाम खाते या शासनची जमीनवर गट क्रमांक २ मधील ३७ आर शासकीय जमिनीवर शासनामार्फत लावण्यात आलेली सुमारे ५०० ते ६०० झाडे अज्ञात भूमाफियांनी ट्रॅक्टरच्या साहाय्यानेसंपूर्णपणे तोडून टाकली आहेत. 

ही धक्कादायक घटना शनिवार, दि ०८ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ च्या दरम्यान घडली. या बेफिकीर कृत्यामुळे पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला असून, शासनाच्या मोहिमेवर पाणी फिरवलं गेलं आहे. स्थानिक समाजसेवक विलास गवळी यांनी या घटनेबाबत विचारपूस केली असता, संबंधित व्यक्तींनी उडवाउडवीची उत्तरे दिली, अशी माहिती मिळाली आहे. घटनेची नोंद स्थानिक प्रशासनाकडे देण्यात आली असून, सदर पर्यावरणविरोधी कृती करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.